देश

येत्या काळात ऑफिसेसमध्ये करावे लागतील हे बदल, कारण....

पूजा विचारे

मुंबई - अनेक देशांमध्ये लॉकडाऊन उठवला जातोय. जगभरातील विविध देशांचं आर्थिक गणित हे त्या त्या देशातील उद्योग-धंद्यांवर अवलंबून आहे . मात्र कोरोनाच्या सावटाखाली ऑफिसेस सुरु करणं आणि वर्क स्पेसेस व्हायरस फ्री ठेवणं हे कठीण आहे असं तज्ज्ञांना वाटतंय

कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारताप्रमाणे अनेक देशांमधील कार्यालयं पूर्णपणे बंद आहेत. सर्वांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आलंय. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉक डाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प आहे. देशांची आर्थिक परिस्थिती कमकुवत होण्याच्या मार्गावर आहे. अशात विविध देशांच्या सरकारांना जास्त दिवस लॉकडाऊन सुरु ठेवणं परवडणारं नाही. काही देशांमध्ये लॉकडाऊनमुळे परिस्थिती नियंत्रणात देखील येतेय. मात्र जोवर कोरोनावर कोणतं औषध किंवा लस येत नाही तोवर कोरोनाची टांगती तलवार सर्वांच्याच डोक्यावर कायम असेल हे मात्र नक्की.

भारतात येत्या ३१ तारखेला लॉकडाउनचा चौथा टप्पा पूर्ण होतोय. जे भाग रेड झोनमध्ये नाहीत अशा ठिकाणी विविध उद्योग सुरु करण्यास परवानगी देखील मिळालीये येत्या काळात ऑफिसेस सुरु करण्याची देखील परवानगी मिळेलही कदाचित. मात्र तज्ज्ञांच्या मते ऑफिसेस किंवा तुम्ही जिथे काम करतात त्या जागा व्हायरस फ्री ठेवणं कठीण आहे. 

एका सर्वेक्षणातून एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलीये. ज्यामध्ये 'फ्लू'चा १६ टक्के संसर्ग ऑफिसमधून होतो असं नमूद करण्यात आलंय. त्यामुळे येत्या काळात आणि मुख्यत्वे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन पद्धतीनं आणि फिजिकल डिस्टंसिंगचे नियम पाळून, भान राखून कर्मचाऱ्यांच्या कामासाठीच्या जागा डिझाईन कराव्या लागतील. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांच्या बसण्याच्याच जागा नाही तर कदाचित काही नियमांमध्ये किंवा अगदी दिनचर्येतही बदल करावे लागू शकतात. 

हे बदल होणं आवश्यक:  

  • काही कार्यालयांमध्येकर्मचाऱ्यांना बसण्यासाठी चौकोनी भाग तयार करुन देणं. 
  • त्यांच्या टेबलवर कागदाचं आवरण ठेवणं.
  • ऑफिसच्या मीटिंगचा वेळ कमी आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर भर देणं. 
  • ऑफिसमध्ये संसर्ग टाळण्यासाठी ६ फुटांच्या अंतरावर वर्तुळ तयार करणं.
  • कर्मचाऱ्यांची वेळोवेळी थर्मल स्क्रीनिंग करणं म्हणजे तापमान मोजणं. 
  • फिंगरप्रिंट स्कॅनरपेक्षा ब्लूटूथनं हजेरी लावणं.
  • ऑफिसची दारं सतत उघडी ठेवणं किंवा स्वयंचलित दारं लावणं. 
  • लिफ्टमध्ये एकाच वेळी कमीत कमी लोकं येतील अशी व्यवस्था करणं. 
  • ऑफिसमध्ये वेळोवेळी स्वच्छता ठेवणं. 
  • एखाद्या कर्मचाऱ्याला बरं नसेल तर त्याला पूर्ण पगार देऊन घरी राहण्याचा सल्ला देणं. 
  • ऑफिसमध्ये हवा खेळती राहील याची व्यवस्था करणं. 

ऑफिसमध्ये काम करताना हे बदल होणं आवश्यक आहेत मात्र त्याआधी सरकारनं ऑफिस सुरु झाल्यानंतरही कोरोनापासून बचाव कसा करावा याबद्दल काही महत्वाचे नियम सांगितले आहेत. 

देशातल्या कार्यालयांना सरकारचे निर्देश:

  • कर्मचाऱ्यांमध्ये कमीतकमी १ मीटरचं अंतर असणं बंधनकारक आहे. 
  • मास्कचा वापर करणं तसंच काही वेळाच्या अंतरानं साबणानं किंवा सॅनेटाईझरनं हात स्वच्छ करणं बंधनकारक. 
  • जर कुणाला लक्षणं असती तर त्यांना सुट्टी देणं किंवा वर्क फ्रॉम होम देणं बंधनकारक. 
  • जर कुठला कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला तर त्याच्या कामाची जागा सॅनेटाईझ करणं.
  • त्याच्या संपर्कात आलेले हायरिस्क आणि लोरिस्क जण शोधून काढणं आणि हायरिस्क व्यक्तींना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करणं आणि लोरिस्क व्यक्तींवर लक्ष ठेवणं बंधनकारक. 

त्यामुळॆ भारतात कोरोनाकाळातही ऑफिस सुरु ठेवण्यासाठी आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी या नियमांचं तसंच बदलांचं पालन करणं महत्वाचं असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT