CJI DY Chandrachud 
देश

DY Chandrachud : SCच्या चुकीमुळे ९८ कोटींचा घोटाळा; सरन्यायाधिशांना कळताच, बदलला निर्णय...

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाच्या चुकीच्या निर्णयामुळे ९८ कोटींची रक्कम ज्याच्याकडे जाणे अपेक्षित नव्हते, ती अशा व्यक्तीच्या हातात गेली, मात्र जेव्हा सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा मानून तो बदलला.

ज्या दोन लोकांकडे ही रक्कम गेली होती, त्या दोघांना ती रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आले. इतकंच नाही तर दोन्ही व्यक्ती व्याजाच्या रकमेसह हे पैसे सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करतील, असं सरन्यायाधीशांनी आपल्या निर्णयात म्हटलं आहे.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाचा पूर्वीचा निर्णय बदलला होता आणि म्हटले होते की, ज्या आदेशात दोन जणांना ९८ कोटी रुपये देण्यात आले ते आदेश चुकीचे होते, असे आम्ही मानत आहोत. आता आपण स्वतःची चूक सुधारत आहोत. तो निर्णय फेटाळला जातो.

भारताच्या सरन्यायाधीशांनी अॅक्टस क्यूरी नेमिनेम ग्रावाबिटचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाचा पूर्वीचा निर्णय बदलला. ग्रावाबिटच्या वापरासाठी हे योग्य प्रकरण आहे, असं वाटत असल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटले होते. ज्या प्रकरणांमध्ये न्यायालयाकडूनच चूक झाली असेल अशा प्रकरणांमध्ये ग्रावाबिट लागू होते.

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस एन धिंग्रा यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती, ज्या अंतर्गत युनिटेकच्या मालमत्ता विकल्या जाणार होत्या. युनिटेकमध्ये घरे घेण्यासाठी गेलेल्या लोकांचे पैसे लवकरात लवकर परत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला होता.

युनिटेकने आपली जमीन देवास ग्लोबल सर्व्हिसेस एलएलपीला विकली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा करार करण्यात आला होता. न्यायमूर्ती धिंग्रा समितीच्या अहवालाच्या आधारे दोन लोकांना ९८ कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सीजेआय खंडपीठाने सांगितले होते. मात्र, समितीने आपल्या अहवालात कोणताही ठोस आधार दिलेला नाही, ज्याच्या आधारे ही रक्कम दोन जणांना दिली गेली असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या चुकीमुळे नरेश केम्पाना यांना ४१.९६ कोटी आणि कर्नल मोहिंदर खैरा यांना ९ कोटी रुपये देण्यात आले होता. आता दोघांनाही नऊ टक्के व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश दिले.

युनिटेकने दावा केला होता की, बेंगळुरूमध्ये असलेल्या 26 एकर 19 गुंठे जमिनीचा तेच खरे मालक आहे. कंपनीने सांगितले की 172.08 च्या विक्री डीडचा तो मालक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे, सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये युनिटेकच्या खात्यात 87.35 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले. मात्र चुकीमुळे उर्वरित रक्कम नरेश आणि कर्नल खैरा यांच्या खात्यात गेली. युनिटेकच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एन वेंकटरामन यांनी सीजेआय खंडपीठासमोर सांगितले होते की, धिंग्रा समिती आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT