देश

गुजरातला जाणाऱ्या गाडीत कोट्यवधी;नोटा मोजायला लागला दिवस

नामदेव कुंभार

राजधानी दिल्लीवरुन गुजरातला जाणाऱ्या एका गाडीतील कोट्यवधींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या गाडीतील रक्कम मोजण्यासाठी संपूर्ण दिवस लागला. पैसे मोजण्यासाठी बँकेतील मशीन्सही मागवण्यात आल्या होत्या. राजस्थानातील डुंगरपूर पोलिसांनी शनिवारी राष्ट्रीय महामार्ग 8 वरून गुजरातकडे जाणारी एक कार जप्त केली. या कारमध्ये कोट्यवधी रुपये सापडले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून कसून चौकशी सुरु आहे.

महामार्ग 8 वरून जाणाऱ्या गाडीला डुंगपूर जिल्ह्यातील बिछीवाडा पोलिसांनी अडवून झाडाझडती घेतली. यावेळी पोलिसांनी यामध्ये कोट्यवधींची रक्कम आढळून आली. पोलिसांनी तात्काळ चालकासह दोघांना अटक करत गाडी ताब्यात घेतली. कारची झाडाझडती घेतल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले. कारण, गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात नोटांचे बंड्डल होते. नोटा मोजण्यासाठी पोलिसांना बँकेमधून मशीन्स मागवाव्या लागल्या.

सकाळी सुरू झालेलं नोटा मोजण्याचं काम सायंकाळपर्यंत सुरू होतं. ज्या कारमधून ही रक्कम घेऊन जाण्यात येत होती. त्या गाडीचा क्रमांक DL8CA X3573 असा आहे. या कारमध्ये तब्बल साडेचार कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.ही रक्कम दिल्लीहून गुजरातला हवालाच्या मार्गे नेण्यात येत होती, अशी माहिती समोर आली आहे. पोलीस उपअधीक्षक मनोज सवारिया यांच्या पथकानं ही मोठी रक्कम जप्त केली आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरु आहे. प्राथमिक तपासात ही रक्कम हवाल्याचं असल्याचं दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT