Directorate of Vigilance and Anti-Corruption esakal
देश

VIDEO : तामिळनाडूत DVAC ची मोठी कारवाई; माजी मंत्र्याच्या 26 ठिकाणांवर छापे, 7 आमदार ताब्यात

माजी मंत्री एसपी वेलुमणी यांच्यावर कारवाईची ही पहिलीच वेळ नाहीय.

सकाळ डिजिटल टीम

माजी मंत्री एसपी वेलुमणी यांच्यावर कारवाईची ही पहिलीच वेळ नाहीय.

चेन्नई : तामिळनाडूतील (Tamil Nadu) कोईम्बतूरमध्ये माजी राज्यमंत्री एसपी वेलुमणी यांच्या घरावर DVAC म्हणजेच, दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयानं (Directorate of Vigilance and Anti-Corruption) छापा टाकलाय. माजी राज्यमंत्री वेलुमणी (SP Velumani) यांच्याशी संबंधित आरोपांसंदर्भात डीव्हीएसी कोईम्बतूरसह 26 ठिकाणी शोध घेत आहे.

माजी मंत्र्यावर आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर करून आपल्या जवळच्या सहकारी कंपन्यांना अन्यायकारकपणे निविदा दिल्याचा आरोप आहे. एआयएडीएमकेचे कार्यकर्ते वेलुमणींच्या घराजवळ उपस्थित असून मंत्र्यांवरील या कारवाईचा निषेध करत आहेत. एएनआय वृत्तानुसार, तामिळनाडू पोलिसांनी (Tamil Nadu Police) 7 AIADMK आमदार आणि अनेक कार्यकर्त्यांना माजी राज्यमंत्री वेलुमणी यांच्या निवासस्थानाबाहेर दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी संचालनालयाच्या छाप्याविरोधात निदर्शनं केल्याबद्दल ताब्यात घेतलंय.

दरम्यान, एआयएडीएमकेचे माजी मंत्री एसपी वेलुमणी यांच्यावर कारवाईची ही पहिलीच वेळ नाहीय. याआधी जुलैमध्ये प्राप्तिकर विभागानं त्यांचा जवळचा सहकारी चंद्रशेखर यांच्या घरावर देखील छापा टाकला होता. त्यावेळी आयकर विभागानं 6 ठिकाणी छापे टाकल्याचं सांगण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Lakhani Bolero Accident : माहेरची वाट धरली अन् काळाने घाला घातला; तीजसाठी निघालेल्या ९ जणींचा अपघातात करुण अंत

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : लक्ष्मण हाकेंचा अभिजीत दिपकेंना टोला; म्हणाले, ‘आधी...

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

SCROLL FOR NEXT