Earthquake esakal
देश

Earthquake In Jaipur: राजस्थानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, धरती हादरली! लोक रस्त्यावर...

Sandip Kapde

Earthquake In Jaipur: राजस्थानच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. जयपूरमध्ये पहाटे 4.10 ते 4.23 पर्यंत दोन मोठे भूकंपाचे धक्के जाणवले. राजघनीसह राज्यातील इतर शहरांमध्येही साडेचार वाजेपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले.

जयपूरमधील भूकंपामुळे लोक इमारतींमधून बाहेर पडले आणि रस्त्यावर आले होते. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अरावलीच्या टेकड्या असल्याचे सांगण्यात आले आहे. या भूकंपाची तीव्रता 4.4 इतकी सांगण्यात येत आहे.

राजस्थानच्या जयपूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले. भूकंपाचा हादरा इतका जोरदार होता की सर्वांची झोप उडाली आणि लोक आपापल्या इमारती आणि घरातून बाहेर आले.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 एवढी होती. भूकंपाचा परिणाम जवळपासच्या अनेक जिल्ह्यांमध्येही दिसून आला. प्राथमिक माहितीनुसार या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. (latest marathi news)

तासाभरात तीन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा पहिला हादरा 4:10 मिनिटांनी, दुसरा 4:23 वाजता आणि तिसरा 4:25 मिनिटांनी बसला. याचवेळी, मणिपूरच्या उखरुलमध्ये पहाटे 05:01 वाजता 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

Marathi News Live Updates : गणरायाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपुरात पोलिसांची कारवाई; डीजेचे साहित्य जप्त

कच्चं तेल १०८ डॉलरवर, सोमवारी ३.३ टक्क्यांची वाढ; कोणत्याही क्षणी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

Ganeshotsav : वैद्यकीय साहित्यापासून साकारली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; आरोग्यसेवा व पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT