Biryani Sakal
देश

Biryani : बिर्याणीतील मसाल्यामुळे पौरुषत्व कमी होते; TMC नेत्याचा अजब दावा

सकाळ डिजिटल टीम

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने बिर्याणीच्या मसाल्यामुळे पुरूषामधील पौरुषत्व कमी होते असा अजब दावा केला आहे. त्यानंतर या नेत्याने बंगालमधील बिर्याणीचे दुकाने बंद पाडण्यास भाग पाडले आहे. रविंद्रनाथ घोष असं या नेत्याचे नाव असून ते ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील माजी मंत्री आहेत.

(Biryani Spices Reduce Sex Drive)

रविंद्रनाथ घोष यांनी सांगितलं की, "बिर्याणीतील मसाल्यामुळे अनेक लोकांच्या पौरूषत्वावर परिणाम झाला आहे. अनेक लोक याचे बळी पडले आहेत" असा अजब दावा त्यांनी केला. त्याचबरोबर मागच्या काही दिवसांत याप्रकरणी अनेक तक्रारी आल्या आहेत. अनेक पुरूषांना लैंगिक समस्या आल्या असून बिर्याणीमध्ये कोणत्या मसाल्याचा वापर केला आहे हे त्यांना माहिती नाही असंही घोष म्हणाले.

उत्तरप्रदेश आणि बिहारमधील अनेकजण परवानगीविना बिर्याणी विकतात असा दावाही त्यांनी केला तर काही जणांनी तक्रार केल्यानंतर आम्ही ते दुकाने शोधून ज्या दुकानांकडे परवानगी नाही असे दुकाने बंद पाडले आहेत असंही घोष म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या खासगी बसला ट्रकची धडक; एकाचा मृत्यू, ५ जण जखमी

शालेय शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय! चौथी ते आठवीतील मुलींना आता स्वसंरक्षणाचे धडे; तायक्वांदो, कराटे, ज्यूदो, क्राव मागा, बॉक्सिंगचा समावेश, वाचा...

Pune News: स्पा सेंटरवर पोलीस छापा, घाबरून इमारतीवरून मारली उडी; तरुणीचा मृत्यू

Karad News: आयबी, एटीएसचे पथक कऱ्हाडमध्ये दाखल; बांगलादेशींकडे कसून चौकशी, संपर्कातील लोकांचीही झाडाझडती!

मोठी बातमी! ७/१२ उताऱ्यावरील पोटहिश्शाची मोजणी आता २०० रुपयांत; ‘या’ वेबसाईटवर करा ऑनलाईन अर्ज, ९० दिवसांत होईल मोजणी

SCROLL FOR NEXT