देश

आता बेळगावमध्ये महिला चालविणार ‘ई-रिक्षा’

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - बेळगाव स्मार्ट सिटी विभागाने महिला सबलीकरणासाठी नवे पाऊल उचलले आहे. स्मार्ट सिटी योजनेतून ३१ ई-रिक्षांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामधील सात ई-रिक्षा महिलांना देण्यात येणार आहेत. या माध्यमातून बेळगावातील रस्त्यांवर पहिल्यांदाच ई-रिक्षा धावणार आहेत. त्यासाठी १५ जुलैपर्यंत शहरातील पात्र लाभार्थींकडून अर्ज मागविले आहेत. अर्जासोबत आवश्‍यक ती कागदपत्रे व माहितीही जोडावी लागणार आहे.

ई-रिक्षासाठी आवश्‍यक अर्जाचा नमुना बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. शिवाय स्मार्ट सिटीच्या टिळकवाडीतील कार्यालयातही अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. याआधी महापालिकेकडून शहरातील लाभार्थीना रिक्षांचे वितरण केले आहे. पण, महिलांसाठी रिक्षा दिलेल्या नाहीत. पण, ई-रिक्षा योजनेत महिलांना रिक्षाच्या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ३१ ई-रिक्षांचे वितरण होणार आहे.

सामान्य प्रवर्गासाठी १८ रिक्षा दिल्या जाणार असून त्यातील पाच रिक्षा महिलांना देण्यात येतील. दिव्यांग व्यक्‍तीला एक रिक्षा तर अल्पसंख्यांकाना पाच रिक्षा देण्यात येणार आहेत. त्यातील एक रिक्षा महिलेसाठी असेल. अनुसूचित जमातीसाठी दोन रिक्षा देण्यात येणार आहेत. अनुसूचित जातीसाठी पाच रिक्षा दिल्या जाणार आहेत. त्यापैकी एक रिक्षा महिलेसाठी राखीव असेल. सर्व प्रवर्ग मिळून एकूण ७ महिलांना ई-रिक्षा मिळणार आहेत. त्यासाठी महिलांना अर्ज करावा लागणार आहे. लाभार्थींची निवड लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे.  

परवाना सक्‍तीचा
ई-रिक्षासाठी अर्ज करणाऱ्या महिला किंवा अन्य लाभार्थींना वाहन चालविता येणे आवश्‍यक आहे. तसेच त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना असणेही सक्‍तीचे आहे. २१ ते ४५ वयोगटातील अर्जदारांनाच ई-रिक्षा दिली जाणार आहे. अर्जदाराचे किमान शिक्षण आठवी उत्तीर्ण आवश्‍यक आहे. शहराचे रहिवासी असलेल्यांनाच अर्ज करता येणार आहे.

महिलांना ७५ टक्‍के सवलत
योजनेत लाभार्थींकडून काही रक्कम घेतली जाणार आहे. पुरुष लाभार्थीना ९०,७५० रुपये म्हणजे ई-रिक्षाच्या एकूण किमतीच्या ५० टक्के रक्कम भरावी लागेल. महिलांना केवळ २५ टक्के म्हणजे ४५,३७५ रुपये भरावे लागतील. मुख्य म्हणजे ई-रिक्षा मिळणाऱ्या लाभार्थीलाच ती चालवावी लागेल. रिक्षा भाडेतत्वावर अन्य कोणालाही देता येणार नाही.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

SCROLL FOR NEXT