Vaccination Center sakal media
देश

Economic Survey 2022-23 : अनेक अडचणींनंतर देशातली कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी; सर्वेक्षणातून कौतुक

पात्र लोकांपैकी ९० टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राबवण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेचं आर्थिक सर्वेक्षणामध्ये कौतुक करण्यात आलं आहे. अनेक अडचणी येऊनही ही मोहीम यशस्वी ठरल्याचं या सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे. पात्र लोकांपैकी ९० टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचंही यात म्हटलं आहे.

१६ जानेवारी २०२१ पासून देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे. ६ जानेवारी २०२३ पर्यंत देशात लसीचे २२० कोटी डोस देण्यात आले आहेत. ही जगातली सगळ्यात मोठी लसीकरण मोहीम ठरली आहे.

हेही वाचा - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

कोविन या अॅपच्या डिजिटल पायाभूत सुविधेमुळे हे लसीकरण शक्य झाल्याचंही आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे. सरकारने डिजिटल आरोग्य सेवा वितरणावर अधिक लक्ष केंद्रीत केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. लसीकरणाचे नियोजन, अंमलबजावणी, देखरेख, मूल्यमापन करण्यासाठी कोविन सिस्टीम उपयुक्त ठरल्याचं अहवालात म्हटलं आहे.

पूर्वी लसींचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत होता. पण कोविन अॅपच्या वापरानंतर हा अपव्यय टाळण्यात यश आल्याचंही अहवालात म्हटलं आहे. हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की, लसीकरणासाठी पात्र लोकसंख्येपैकी ९७ टक्के जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस घेतला आहे. तर ९० टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT