ED filed a case against BBC under Foreign Exchange Management Act esakal
देश

Case against BBC : BBC वर ईडीची मोठी कारवाई! दाखल केला गुन्हा

रोहित कणसे

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बीबीसी इंडियावर कारवाई केली आहे. ईडीने बीबीसी विरोधात परकीय व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाआहे. बीबीसी इंडियावर फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बीबीसीवर विदेशी निधीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर ईडीने फेमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वी बीबीसी गुजरात दंगलीवरील माहितीपटाच्या संदर्भात वादात सापडले होते. केंद्र सरकारने माहितीपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. मागच्या वर्षी आयकर विभागाने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयातही झडती घेतली होती.

सूत्रांनी सांगितले की तपास एजन्सी ईडीने FEMA च्या तरतुदींनुसार बीबीसीच्या काही अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे आणि स्टेटमेंटचे रेकॉर्डिंगही मागवले आहे. ईडी कंपनीने केलेल्या कथित परकीय गुंतवणूक (एफडीआय) उल्लंघनाचीही चौकशी करत आहे.

आयकर विभागाकडून झडती

आयकर विभागाने यावर्षी बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयातही झडती घेतली होती. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) आणि प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी सांगितले होते की बीबीसी ग्रुपच्या विविध संस्थांनी दाखवलेले उत्पन्न आणि नफा त्यांच्या भारतातील कामकाजाच्या प्रमाणाशी सुसंगत नाही. बीबीसी इंडियाने कर भरला नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

आतापर्यंत काय घडलं?

बीबीसी कार्यालयावर आयकर खात्याच्या सर्व्हे रेड पाठोपाठ आता ईडीने देखील कारवाई केली आहे. ईडीने FEMA अंतर्गत विदेशी फंडात अनियमिततेचा ठपका ठेवत बीबीसीविरोधात गुन्हा दाखल केली आहे.

दरम्यान यापूर्वी 17 जानेवारी रोजी India:The Modi question ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित झाली होती. यानंतर 20 जानेवारी रोजी त्याच्या भारतात प्रसारणास बंदी घालण्यात आली. तसेच 14 फेब्रुवारी आयकर खात्याची 3 दिवसांची धाड बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयावर पडल्या, यावेळी सर्व्हे केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आता 13 एप्रिल रोजी बीबीसी विरोधात ईडीनेही कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT