Arvind Kejriwal sakal
देश

Arvind Kejriwal : केजरीवालांना चौथ्यांदा नोटीस; ‘ईडी’कडून १८ जानेवारीला हजर राहण्याचे निर्देश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणातील चौकशीसाठी आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) सलग चौथ्यांदा नोटीस बजावली आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणातील चौकशीसाठी आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) सलग चौथ्यांदा नोटीस बजावली आहे. त्यांना येत्या १८ जानेवारीला ‘ईडी’ कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून केजरीवाल यांना आज मिळालेली ही चौथी नोटीस आहे. पहिल्यांदा निवडणूक प्रचारामुळे, त्यानंतर विपश्यना शिबिराला जाणार असल्याचे कारण देत त्यांनी ‘ईडी’च्या कार्यालयात जाणे टाळले होते. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ही नोटीस बेकायदा व राजकीय भावनेतून पाठविण्यात आल्याचे म्हटले आहे. या नोटिशीमध्ये आरोपी म्हणून की साक्षीदार म्हणून विचारणा होणार याचाच उल्लेख नसल्याचे केजरीवाल यांनी म्हटले होते.

‘ईडी’ने लेखी प्रश्न पाठवावे त्याचे उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी तपाससंस्थेला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. केजरीवाल यांच्या या पत्राला ‘ईडी’ने अद्याप उत्तर दिलेले नाही. यामुळे येत्या १८ जानेवारीला मुख्यमंत्री केजरीवाल ‘ईडी’च्या कार्यालयात जाणार की पुन्हा गैरहजर राहणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

केजरीवालांचा गोवा दौरा

येत्या १९ जानेवारीपासून मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या दोन दिवसांच्या गोवा दौऱ्याला सुरूवात होणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. राज्यातील पक्ष संघटनेचाही ते आढावा घेतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

केंद्र सरकार केजरीवालांना रोखण्यासाठी ‘ईडी’चा गैरवापर करत आहे, स्वतः ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी सरकारच्या हातातील शस्त्र बनणे टाळावे. समन्स केजरीवालांपर्यंत पोचण्याआधीच ते माध्यमांच्या हाती कसे काय लागले?

- गोपाल राय, ‘आप’चे नेते आणि मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT