Nirav_Modi
Nirav_Modi 
देश

"ईडी'कडून नीरव मोदीच्या 147 कोटींच्या मालमत्तेवर टाच 

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या मुंबई व सुरतमधील 147.72 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मंगळवारी (ता. 26) टाच आणली. 

ईडीने मनी लॉड्रिंग (पीएमएलए) कायद्याअंतर्गत कारवाई करून जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये आठ कार, सुरतमधील प्रकल्प व यंत्रसामग्री, इमारती, दागिने, महागडी पेटिंग आदीचा समावेश आहे. त्यांचे एकत्रित बाजारमूल्य 147.72 कोटी असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ही मालमत्ता नीरव मोदी व त्याच्या मालकीच्या फायरस्टार डायमंड, राधेशीर ज्वेलरी, रिदम हाऊस या कंपन्यांच्या नावावर आहे. ईडीने यापूर्वी कारवाई करून नीरवच्या देशात व विदेशात असलेल्या सुमारे 1,725.36 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. शिवाय समूहाकडील 489.75 कोटी रुपयांचे सोने, दागिने, हिरे तसेच इतर ऐवजही जप्त केला होता. 

दरम्यान, हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर नीरव मोदी भारतातून फरार झाला असून, त्याने ब्रिटनमध्ये आश्रय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यासह या प्रकरणाशी संबंधित इतर आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. 

आलिशान गाड्याही जप्त 
ईडीने नीरव मोदीशी संबंधित नऊ आलिशान गाड्या गुरुवारी जप्त केल्या होत्या. यामध्ये रोल्स रॉईस घोस्ट, मर्सिडीज बेंझ, पोर्श पनामेरा, तीन होंडा कार, टोयोटा फॉर्च्युनर आणि इनोव्हा यांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या वर्षी ईडीने कंपनीच्या खात्यातील 30 कोटी रुपये व साडेसात कोटींचे समभाग गोठवले होते आणि मोठ्या प्रमाणात परदेशी बनावटीची महागडी घड्याळेही ताब्यात घेतली होती. या प्रकरणात त्याच्याकडील 94 कोटी 52 लाखांचे म्युच्युअल फंड व समभाग गोठवण्यात आले होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT