देश

Mahadev App : 'महादेव अ‍ॅप'प्रकरणी कॉमिडियन कपिल शर्मासह अन्य दोघांना ईडीचं समन्स

संतोष कानडे

मुंबईः महादेव बुक अ‍ॅप प्रकरणी अनेक बॉलिवूड अभिनेत्यांना ईडीने समन्स दिलेलं आहे. त्यातच आता विनोदी कलाकार कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि हिना खान यांनी ईडीने समन्स बजावलं आहे.

महादेव बुक या अ‍ॅपची जाहिरात करणारे कलाकार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच महादेव अ‍ॅपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्या दुबईमध्ये पार पडलेल्या अलिशान लग्न सोहळ्यात सादरीकरण करणाऱ्या सेलिब्रेटिंना आर्थिक मोबदला मिळाल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे कारवाईचा जोर वाढतोय.

आता पुन्हा कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान यांना ईडीने समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी कधी होणार आणि आणखी कोण सेलिब्रिटी यामध्ये अडकणार, हे येत्या काळात कळेलच.

कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांना ईडीने समन्स दिल्याची माहिती 'एएनआय'ने ईडीच्या सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

अभिनेता रणबीर कपूरनंतर अनेक प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार ईडीच्या रडारवर आहेत. अनेकांनी महादेव बुक App ची जाहिरात केल्याचं समोर येत आहे. रणबीर कपूर याच्या बरोबरच अमिषा पटेल, श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा, इम्रान हाश्मी, बोमन इराणी, कॉमेडियन भारती सिंग आणि इतर गायकांचा यात समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT