ED raids Aam Aadmi Party MLA Amanatulla Khan in money laundering case  esakal
देश

ED Raids Aam Aadmi Party MLA : 'आप'च्या नेत्यांवर ईडीची कारवाई सुरूच, आता आमदाराच्या घरावर छापा

दिल्लीत आम आदमी पक्षाच्या नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरूच आहे

रोहित कणसे

दिल्लीत आम आदमी पक्षाच्या नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरूच आहे. मंगळवारी ईडीचे पथक आप आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी ओखला येथे दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 6.30 वाजता ईडीची टीम त्याच्या घराजवळ पोहोचली आणि जवळपास 7.30 वाजता अंमलबजावणी संचालनालयाचे पथक अमानतुल्ला खान यांच्या घरात घुसले.

मीडिया रिपोर्टनुसार, ईडीने गेल्या वर्षी अमानतुल्ला खान यांच्याविरोधात वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याच्या आधारे हा छापा टाकला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अमानतुल्ला यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी एसीबीने दिल्लीतील त्यांच्या संबंधित 5 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात 12 लाख रुपये रोख, 1 विनापरवाना बेरेटा पिस्तूल आणि 2 वेगवेगळ्या बोअरची काडतुसे जप्त करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी ईडीने आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या घरी देखील छापे टाकले होते. येथे धेखील ईडीने काही दस्तावेज जप्त केले होते. दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात संजय सिंह यांच्या ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले होते. ईडीने तब्बल आठ तास छापेमारी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk : फडणवीसांनी घडवला इतिहास! Starlink चं इंटरनेट सगळ्यांत पहिलं महाराष्ट्रात.. इलॉन मस्कच्या कंपनीसोबत झाला करार

अप्पी आणि अमितने ८ वर्ष का लपवून ठेवलं त्यांचं नातं? स्वतः सांगितलं कारण; म्हणाले- आम्हाला अजिबात...

AUS vs IND: भारताच्या फिरकी जाळ्यात अडकले ऑस्ट्रेलियन्स! चौथा T20I जिंकून टीम इंडियाची मालिकेत आघाडी

Latest Marathi Live Update News : दक्षिण मुंबईतील मरीन लाईन्स परिसरातील इमारतीला मोठी आग, घराल माणसं अडकल्याची भीती

Beautiful Villages India: निसर्गाचा गुपित! भारतातील 5 सुंदर गावं जे तुम्हाला मंत्रमुग्ध करतील

SCROLL FOR NEXT