ed raids haryana former NDLA mla dilbag singh and associates Cash arms found  
देश

हरियाणात माजी आमदाराच्या घरावर EDची छापेमारी; 5 कोटींची रोकडीसह 5 किलो सोने अन् 300 काडतुसे जप्त

ईडीने आज इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी) चे माजी आमदार दिलबाग सिंह आणि इतरांशी संबंधीत २० हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली.

रोहित कणसे

प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने गुरुवारी सकाळ बेकायदेशीर खाणकाम प्रकरणात हरियाणा काँग्रेसचे आमदार सुरेंद्र पंवार, इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी) चे माजी आमदार दिलबाग सिंह आणि इतरांशी संबंधीत २० हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली.

ईडीच्या पथकांना पीएमपीएलएच्या तरतूदीनुसार गुरुवारी सकाळी एक सोनीपतमध्ये काँग्रेस आमदार सुरेंद्र पंवार यांचे सेक्टर १५ येथील निवासस्थान, त्यांचे सहकारी सुरेश यांचे घर, भाजपा नेता व करनालचे माजी डिप्टी मेयर मनोज वधवा यांच्या सेक्टर १३ येथील निवासस्थान यमुनानंगर मध्ये इनेलोचे माजी आमदार दिलबाग सिंह यांचं घर, कार्यालय आणि फार्म हाऊस या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

ईडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आमदार सुरेंद्र पंवार, माजी आमदार दिलबाग सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणांवरून बेकायदेशीर हत्यारे, ३०० काडतूस, १००हून अधिक दारुच्या बाटल्या आणि पाच कोटींची रोकड, ४/५ किलोग्राम सोन्याची बिस्कीटे ताब्यात घेण्यात आले आहेत. सोबतच भारत आणि इतर देशातील संपत्तीबद्दल देखील माहिती मिळाली आहे. सुरेंद्र पंवार यांच्या घरावर मागील २४ तासांपासून छापेमारी सुरू आहे.

ईडीने अधिकारी बेकायदेशीर खाणकाम व ई रवाना स्कॅमसंबंधीत प्रकरणात काँग्रेस आमदार सुरेंद्र पंवार यांच्याकडून माहिती घेत आहे. काल सकाळी आठ वाजता वेगवेग्ळ्या पाच गाड्यांमधून ईडीचे अधिकारी आणि सीआयएसएफ चे जवान सुरेंद्र पंवार यांच्या घरी पोहचले होते.

कोर्टाच्या आदेशानंतर ईडीने या प्रकरणात एफआयआर दाखल केली होती. छाप्यादरम्यान ईडीचे पथक खाणकामाशी संबंधीत कागदपत्रे, बँक खाते आणि जमीनीशी संबंधीत कागद गोळा करत आहे. या कारवाईदरम्यान काँग्रेस आमदार घरात उपस्थित होते. सुरेंद्र पंवार यांच्या घरातून ईडीला काही महत्वाचे पुरावे मिळाले आहेत .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT