lalu prasad yadav 
देश

ED Raid : ७० लाखांची कॅश आणि अमेgरिकन डॉलर ! तेजस्वीसह लालूंच्या मुलीच्या घरी ED ची मोठी छापेमारी

सकाळ डिजिटल टीम

ईडीने राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या मुली आणि तेजस्वी यादव यांच्या घरी छापेमारी केली आहे. या छापेमारीत मोठे घबाड जप्त करण्यात आले आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ही छापेमारी केली आहे. 

यादव यांचा धाकटा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह लालूंच्या तीन मुलींकडून ७० लाखांची रोकड जप्त केली. २ किलोपेक्षा जास्त सोने आणि ९०० अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या सोन्यात १.५० किलो दागिने आहेत, तर ५४० ग्रॅम सोन्याचे नाणे आहे.

ईडी अधिकाऱ्यांनी हिन्दुस्तान टाइम्सला सांगितले, दिल्ली-एनसीआर, बिहार आणि झारखंडमधील एकूण २४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. तेजस्वी यादव यांच्याशिवाय लालूंच्या तीन मुली रागिणी यादव, चंदा यादव आणि हेमा यादव यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले. पाटण्यात लालू यादव यांचे निकटवर्तीय असलेले राजद नेते अबू दुजाना यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे.

दरम्यान लालूप्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी केंद्र सरकारवर कुटुंबाला त्रास देण्याचा आरोप केला आहे. लालूंच्या लेकीने एकापाठोपाठ ट्विट करत केवळ लालू यांच्या कुटुंबीयांना मजबूर करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप रोहिणी यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT