Parth Chaterjee Sakal
देश

बंगालमध्ये ED ची मोठी कारवाई; TMC नेत्याच्या मैत्रिणीकडून 20 कोटी जप्त

जप्त केलेले हे पैसे एसएससी घोटाळ्याशी निगडीत असल्याचा संशय ईडीला आहे.

सकाळ डिजिटल टीम

ED Raid In Kolkata : पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी रात्री टीएमसी पक्षाचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळची मैत्रीण अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ही छापेमारी करण्यात आली आहे. यादरम्यान 20 कोटींहून अधिक रोकड, विदेशी चलन आणि सोने इत्यादी जप्त केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच छापेमारीत अनेक गुन्हे दाखले आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेले हे पैसे एसएससी घोटाळ्याशी निगडीत असल्याचा संशय ईडीला आहे. कारवाईच्या काही मिनिटांनंतर भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी "ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है.. असे म्हणत पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे.

छापे टाकण्यात आलेल्यांमध्ये पश्चिम बंगालचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी, माजी शिक्षण मंत्री परेश अधिकारी, पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि तत्कालीन शिक्षण मंत्री आमदार माणिक भट्टाचार्य यांचा समावेश आहे. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात पार्थ चटर्जी सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. एसएससी घोटाळा झाला तेव्हा चटर्जी शिक्षणमंत्री होते.

कोलकत्ता उच्च न्यायालयाने अनेक रिट याचिकांमध्ये नुकतेच केंद्रीय अन्वेषण ब्युरोला गट 'क' आणि 'डी' कर्मचारी, नववी-बारावीचे सहाय्यक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षकांच्या भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणांमध्ये, शिक्षकेतर कर्मचारी (गट C आणि D), शिक्षक कर्मचारी [सहाय्यक शिक्षक (वर्ग IX-XII) आणि प्राथमिक शाळेतील शिक्षकांची बेकायदेशीर नियुक्ती याबाबत ED मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत प्रकरणांची चौकशी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT