AIADMK Supreme Court esakal
देश

AIADMK : पलानीस्वामींनी जिंकली पक्षनेतृत्वाची लढाई; Supreme Court चा पन्नीरसेल्वम यांना मोठा दणका

सर्वोच्च न्यायालयानं ओ पनीरसेल्वम (O Panneerselvam OPS) यांची याचिका फेटाळून लावली.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : AIADMK पक्षातील नेतृत्व वादावर सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) आज आपला निर्णय जाहीर केला. न्यायालयानं मद्रास उच्च न्यायालयाचा दाखला देत म्हटलं की, 'एडप्पाडी के पलानीस्वामी (Edappadi K Palaniswami) यांची AIADMK पक्षाचे एकमेव नेते म्हणून पुन्हा निवड करण्यात आलीये.'

यासोबतच, सर्वोच्च न्यायालयानं ओ पनीरसेल्वम (O Panneerselvam OPS) यांची याचिका फेटाळून लावली. यामध्ये त्यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, ईपीएस अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीसपदी कायम राहणार आहेत.

ई.के. पलानीस्वामी यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात उपस्थित असलेले वकील सी आर्यमा सुंदरम म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत AIADMK सरचिटणीसपदाची निवडणूक होणार नाही. ओ पनीरसेल्वम यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठानं 2 सप्टेंबर 2022 रोजी दिलेल्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयानं आपला निर्णय जाहीर केला.

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेच्या प्रमुख जे. जयललिता (J. Jayalalithaa) यांच्या आकस्मिक निधनानंतर पक्ष ताब्यात घेण्यावरून वाद सुरू झाला. ओ पनीरसेल्वम आणि ई पलानीस्वामी, तसंच जे. जयललिता यांच्या सहकारी शशिकला याही या वादाचा एक भाग होत्या. मात्र, नंतर त्यांनी पक्षावरील आपला दावा सोडला आणि या वादापासून स्वतःला दूर ठेवलं.

अण्णा द्रमुक पक्षात दोन गट पडले. एक गट पक्षाचे दिग्गज नेते ई पलानीस्वामी म्हणजेच, ईपीएस आणि दुसरा ओ पनीरसेल्वम म्हणजेच ओपीएस यांच्यासोबत आला. पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी एक फॉर्म्युला तयार करण्यात आला, ज्याअंतर्गत पलानीस्वामी यांना संयुक्त समन्वयक आणि पन्नीरसेल्वम यांना समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली. पण, पलानीस्वामी यांच्या गटाला पक्षावर पूर्ण अधिकार हवा होता. गेल्या वर्षी 14 जून रोजी जिल्हा सचिवांच्या बैठकीनंतर पक्षात एकहाती नेतृत्वाची मागणी जोर धरू लागली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही गटांनी अनेकवेळा चर्चा केली. मात्र, कोणताही तोडगा निघू शकला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT