supreme-court sakal
देश

Pegasus प्रकरणी आता एडिटर्स गिल्डची सुप्रीम कोर्टात धाव; SIT तपासाची मागणी

विनायक होगाडे

नवी दिल्ली : पेगॅसस पाळत प्रकरणाची विद्यमान अथवा निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार एन. राम आणि शशिकुमार यांनी याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवरील सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविली आहे. ही सुणावणी आता येत्या ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रमण आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाकडून सुनावणी घेतली जाईल. दरम्यान आता संपादकांची वरिष्ठ संस्था एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. याबाबतचं वृत एएनआयने दिलंय. एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने सुप्रीम कोर्टाला फोन टॅपिंग संदर्भात एसआयटीकडून तपास करण्याची मागणी केली आहे.

पेगॅसस हेरगिरी प्रकरणी सरकार सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. फक्त विरोधी पक्षच नव्हे तर पत्रकारांनी देखील सरकारला या प्रश्नावरुन घेरलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरुन विरोधक आक्रमक असलेले पहायला मिळत आहेत. येत्या पाच ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्ट या वादासंदर्भात सुणावणी करणार आहे.

याआधी पेगॅसस हेरगिरीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी ‘द हिंदू’ या दैनिकाचे माजी मुख्य संपादक एन. राम आणि ‘एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझम’चे अध्यक्ष शशी कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पेगॅसस स्पायवेअरचे निर्माते इस्राईलमधील ‘एनएसओ ग्रुप’कडून याच्या वापरासाठी सरकारने किंवा सरकारशी संबंधित संस्थांनी परवाना घेतला होता का, याचा खुलासा करण्याचा आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला द्यावा, अशी मागणीही याचिकेत केली आहे. तसेच भारतीय नागरिकांवर पाळत ठेवण्‍यासाठी याचा वापर केला का हे तपासावे, असेही या म्हटले आहे. या हेरगिरी प्रकरणाची चौकशी विद्यमान अथवा निवृत्त न्यायाधीशांकडून व्हावी, अशी मागणी याचिकेत केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT