CM Pushkar singh Dhami  sakal
देश

CM Dhami: 'एक पेड मां के नाम'...गुरूपौर्णिमेचे औचित्य साधत मुख्यमंत्री धामी यांनी आपल्या आई समवेत केले वृक्षारोपण

He wished the people on Guru Purnima, saying that the first guru in everyone's life is their mother: पंतप्रधान मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त एक झाड आईच्या नावे लावण्यासाठी देशवासीयांना संदेश दिला होता. त्यालाच उद्दिष्ठ ठेवून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी राज्यात या संदेशाला एक अभियानाचे स्वरूप दिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Uttarakhand: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी आपल्या आई समवेत गुरूपौर्णिमेचे औचित्य साधत वृक्षारोपण केले. ते म्हणाले, "प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिला गुरू ही त्याची आईच असते. म्हणूनच या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन आई सोबत वृक्षारोपण अभियानात सहभागी होणे याला मी माझे भाग्य समजतो."

कॅनल रोडलगत असलेल्या गंगोत्री विहारामध्ये रिस्पना नदीच्या किनारी असणाऱ्या मोकळ्या जागेवर मसूरी देहरादून विकास प्राधिकरण यांच्या वतीने वृक्षारोपण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या निमीत्ताने धामी यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या 'एक पेड मां के नाम' या आवाहनाची आठवण करून दिली. राज्यात आता या आवाहनाला एक अभियान म्हणून घेतलं आहे असेही ते म्हणाले. सर्वांच्या आयुष्यातील पहिली गुरू ही त्याची आईच असते असे म्हणत त्यांनी जनतेला गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने एक झाड आपल्या आईच्या नावावर जरूर लावावे असे त्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे.

मुख्यामंत्री म्हणाले,

हरेला सणापासून ते १५ ऑगष्ट पर्यंत राज्यात वृक्षारोपण अभियान सुरू राहील. या अभियानामध्ये काही सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी, काही स्वयंसेवक संघ यांना एकत्रित घेऊन योजना राबवण्यात येणार आहे. राज्यात ग्रामपंचायत स्तरावर देखील अभियान चालवले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT