Election Commission of India sakal
देश

Election Dates in 5 States: पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर; मतदान कधी, निकाल कधी लागणार जाणून घ्या

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आलीये. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

पाच राज्यांची मतमोजणी ३ डिसेंबरला

मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबरला निकाल लागेल. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला, दुसऱ्या टप्प्यातील १७ नोव्हेंबरला मतदान होईल. राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला, तेलंगाणात ३० नोव्हेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबरला निकाल लागेल. फक्त छत्तीसगडमध्ये मतदान दोन टप्प्यात होईल, इतर चार राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडेल.

लोकसभेची सेमीफायनल

मध्य प्रदेशमध्ये मतदान १७ नोव्हेंबरला होणार आहे. सर्व राज्यांचे निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबरला लागतील. पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका या लोकसभा निवडणुकीआधीच्या सेमीफायनल मानल्या जात आहे. पाच राज्यांच्या निकालामध्ये मतदार कोणाला संधी देईल, यावर लोकसभेतील चित्र स्पष्ट होईल असं बोललं जात आहे. त्यामुळे पाच राज्यातील निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

मध्य प्रदेशमध्ये मतदान कधी, निकाल कधी

मतदान- १७ नोव्हेंबर

निकाल- ३ डिसेंबर

राजस्थानमध्ये मतदान कधी, निकाल कधी

मतदान- २३ नोव्हेंबर

निकाल- ३ डिसेंबर

छत्तीसगडमध्ये मतदान कधी, निकाल कधी

मतदान- ७ आणि १७ नोव्हेंबर (दोन टप्प्यात)

निकाल- ३ डिसेंबर

तेलंगाणामध्ये मतदान कधी, निकाल कधी

मतदान- ३० नोव्हेंबर

निकाल- ३ डिसेंबर

मिझोराममध्ये मतदान कधी निकाल कधी

मतदान- ७ नोव्हेंबर

निकाल- ३ डिसेंबर

(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT