Election Commission India Sakal
देश

Bihar Voter List Update: बिहार मतदार यादी पडताळणीबाबत मोठी निवडणूक आयोगाने दिली मोठी अपडेट! ; संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गोंधळ

Election Commission of India shares update on Bihar voter list: जाणून घ्या, निवडणूक आयोगाने आता नेमकी कोणती अपडेट दिली आहे?

Mayur Ratnaparkhe

Overview of Special Revision of Voter List in Bihar: बिहारमध्ये मतदार यादीची विशेष  पुनरावलोकन  प्रक्रिया सुरू असून, आज (२३ जुलै) पर्यंतची अपडेटेड माहिती निवडणूक आयोगाने सर्वांसमोर मांडली आहे. यामध्ये ९८.०१ टक्के मतदारांना समाविष्ट करण्यात आलं आहे. तर २० लाख मृत मतदारांची नोंद झाली आहे. तसेच २८ लाख कायमचे स्थलांतरित मतदारांचीही नोंद झाली आहे.

याशिवाय सात लाख मतदार एकाहून अधिक ठिकाणी नोंदणीकृत आढळले आहेत, तर १ लाख मतदारांचा शोध लागलेला नाही, १५ लाख मतदारांचे अर्ज परत आलेले नाहीत. तसेच, ७.१७ कोटी मतदारांचे अर्ज (९०.८९ टक्के) प्राप्त झाले आणि डिजिटल केले गेले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच, बिहारमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या Special Intensive Revision (SIR) मतदार यादी सुधारणा आणि पडताळणीविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. SIR च्या मुद्द्यावरून पाटण्यापासून दिल्लीपर्यंत राजकीय लढाई सुरू झाली आहे. बिहारमध्ये महाआघाडीचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय जनता दल (RJD) तसेच विरोधी इंडिया ब्लॉकचे पक्ष संसदेत या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी करत आहेत.

बिहार SIR च्या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दोन दिवसांपासून होऊ शकले नाही. बिहार SIR मागे घेण्याची मागणी करणारे विरोधी पक्ष संसदेत चर्चा करू इच्छित आहेत. SIR वर विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प आहे. विरोधी पक्ष सभागृहाच्या आत आणि बाहेर निषेध करत आहेत.

आता बातमी अशी आहे की या मुद्द्यावर संसदेत चर्चा होणार नाही. उच्च सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की सरकार निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर देऊ शकत नाही. सरकार निवडणूक आयोगाच्या वतीने कसे बोलू शकते?, उच्च सरकारी सूत्रांनी स्पष्टपणे सांगितले की, संसदेत SIR वर कोणतीही चर्चा होणार नाही. बिहारमध्ये मतदार यादीचे SIR सरकारकडून नाही तर निवडणूक आयोगाकडून केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भेसळयुक्त दूध पिताय का? उकळताच बनलं रबर, धक्कादायक VIDEO आला समोर

Court Restrooms: हे वापरकर्त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन; कोर्टातील अस्वच्छ स्वच्छतागृहांबाबत स्थिती अहवाल सादर

Latest Marathi News Live Update : पुण्यात पी एम पी बस चालकाकडून मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Beat Firecracker Fumes: फाटाक्यांच्या धुरामुळे किडनी अन् यकृतासंबंधित समस्या वाढल्यास करा 'हे' 5 घरगुती उपाय

PAK vs SA Test: पाकड्यांचे घरच्या मैदानावर वस्त्रहरण; दक्षिण आफ्रिकेने दाखवली जागा; WTC मध्ये दिला शेजाऱ्यांना धक्का

SCROLL FOR NEXT