Election Commission to announce legislative assembly election schedule 
देश

Assembly Elections 2024 : लोकसभेसोबतच 'या' चार राज्यात होणार विधानसभेच्या निवडणुका! निवडणूक आयोगाची घोषणा

Election Commission to announce legislative assembly election schedule 2024 : मागील बऱ्याच दिवसांपासून वाट पाहिली जात होती त्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले

रोहित कणसे

नवी दिल्ली - मागील बऱ्याच दिवसांपासून वाट पाहिली जात होती त्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. यासाठी निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या दोन्ही निवडणूक आयुक्तांची मुख्य निवडणूक आयुक्तांनी ओळख करून दिली. (Election Commission to announce legislative assembly election schedule)

मुख्य निवडणूक आयुक्त यांनी यावेळी माहिती देताना २०२४ हे जगभरात निवडणुकांचं वर्ष असल्याची सांगितलं. यासोबतच १६ जून २०२४ रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपत आहेत त्यामुळे देशभरात लोकसभेच्या निवडणुका होतील, मात्र यासोबतच देशातील आंध्र प्रदेश, ओडिसा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम येथे विधानसभा निवडणुका होणार असल्याची माहिती दिली. या राज्यांमधील विधानसभेचा कार्यकाळ जून २०२४ मध्ये संपणार आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये देखील निवडणुका होणार असल्याची यावेळी त्यांनी जाहीर केलं आहे.

विधानसभेच्या निवडणूका चार राज्यात होणार आहेत. यामध्ये सिक्कीम (३२ जागा) , ओडिसा (१४७ जागा), अरुणाचल प्रदेश (६० जागा) आणि आंध्र प्रदेश (१७५ जागा) यांचा समावेश आहे. या निवडणुका लोकसभा निवडणुकांच्या सोबतच होणार आहेत. आंध्र प्रदेशसाठी नोटीफिकेशन १८ एप्रिल २०२४ रोजी येईल आणि १३ मे २०२४ ला मतदान होईल.

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमसाठी विधानसभेच्या निवडणुका २० मार्च २०२४ रोजी नोटिफिकेशन येईल आणि मतदान १९ एप्रिल २०२४ रोजी होईल.

ओडिशा मध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २८ जागांवर मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना तारीख १८ एप्रिल २०२४ आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०२४ आहे आणि अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २९ एप्रिल २०२४ आहे. पहिल्या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

ओडिशातील विधानसभेच्या ३५ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी २० मे २०२४ रोजी मतदान होणार असून मतमोजणी ४ जून २०२४ रोजी होणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी सांगितलं की, टेक्नॉलॉजी, मनुष्यबळ यात आम्ही परिपूर्ण आहोत. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत १८ ते १९ या वयातील १.८ कोटी तरुण मतदार असणार आहेत. हे मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. ८२ लाख मतदार हे ८५ पेक्षा जास्त वयाचे आहेत तर ४८ हजार तृतीयपंथीय लोकसभा निवडणुकीत मतदान करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT