Congress Leader Rahul Gandhi Slam BJP PM Modi Govt in Bhagalpur Bihar Lok Sabha Election 2024 
देश

PM मोदी आणि राहुल गांधींकडून आचारसंहितेचा भंग! निवडणूक आयोगाने 29 एप्रिलपर्यंत मागितले उत्तर

PM Narendra Modi and Rahul Gandhi: आयोगाने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- आचारसंहितेचा भंग (model code of conduct ) केल्याच्या आरोपाप्रकरणी निवडणूक आयोगाने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याची दखल घेतली आहे. आयोगाने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. (Election Commission took cognizance)

भाजप आणि काँग्रेसकडून एकमेकांविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली होती. समाजात द्वेष पसरवणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, जात, धर्म आणि भाषेच्या आधारे भेदभाव करणे अशा प्रकारचे आरोप एकमेकांविरोधात करण्यात आले होते. निवडणूक आयोगाने भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना नोटीस पाठवली आहे. नोटिसीमध्ये २९ एप्रिलच्या सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे.

निवडणूक आयोगाने याप्रकरणी लोकप्रतिनिधी कायद्या अनुच्छेद ७७ चा वापर करत स्टार प्रचारकांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी पक्षाच्या अध्यक्षांना जबाबदार धरलं आहे. त्यानुसार, आयोगाने दोन्ही अध्यक्षांच्या नावावर नोटीस पाठवली आहे. नोटिसीमध्ये आयोगाने सांगितलंय की, राजकीय पक्षांची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपले उमेदवार आणि स्टार प्रचारकांना संयमित भाषेचा वापर करण्यास सांगावे. मोठ्या पदावर बसलेल्या लोकांच्या भाषणाचा मोठा प्रभाव लोकांवर पडत असतो. त्यामुळे अशा लोकांनी सावधगिरी बाळगायला हवी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका भाषणाला काँग्रेसने धार्मिक आणि आक्षेपार्ह ठरवलं होतं. पंतप्रधान मोदी यांचे भाषण धार्मिक, जातीवादी आणि धर्माच्या नावावर द्वेष पसरवणारे होते असं म्हणत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली.

दुसरीकडे, भाजपने राहुल गांधींच्या एका भाषणावर आक्षेप घेत आयोगाकडे तक्रार केली होती. आतापर्यंत निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने सर्वांना संयम ठेवून वक्तव्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राप्त झालेल्या नोटिसीवर काँग्रेस आणि भाजप काय उत्तर देतं हे पाहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT