Election Commissioner esakal
देश

Election Commissioner : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा; नेमकं कारण काय?

Arun Goel News : लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या मार्गावर आहे. काहीच आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यातच आता निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. अरुण गोयल यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.

संतोष कानडे

Arun Goel News : लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या मार्गावर आहे. काहीच आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यातच आता निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. अरुण गोयल यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.

देशाच्या निवडणूक आयोगाकडे आधीच एक जागा रिक्त होती आणि आता ती फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे उरली आहे. लोकसभेच्या तारखा पुढच्या आठवड्यात जाहीर होणार होत्या. परंतु आता निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यामुळे त्या पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

अरुण गोयल हे 1985 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी 18 नोव्हेंबर 2022 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्याच्या एका दिवसानंतर त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

अन्य निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे हे फेब्रुवारी महिन्यातच निवृत्त झाले असून गोयल यांच्या राजीनाम्यामुळे तीन सदस्यांच्या निवडणूक आयोगात केवळ मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार हेच शिल्लक राहिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसंदर्भात एक नवा कायदा तयार करण्यात आला असून कायदा मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शोध समिती ही आयुक्तांचा शोध घेण्याचे काम करेल. यामध्ये दोन केंद्रीय सचिवांचा देखील समावेश असून तीच समिती पाच जणांची नावे निश्चित करणार आहे. त्यानंतर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील निवड समिती ही मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करण्याचे काम करते.

या समितीमध्ये केंद्रीय मंत्री तसेच लोकसभेतील विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश असतो. कोणीही विरोधी पक्ष नेता नसेल तर सर्वांत मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला या समितीमध्ये स्थान देण्यात येते. या समितीने हिरवा झेंडा दाखविल्यानंतरच राष्ट्रपती हे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांची नेमणूक करतात. तत्पूर्वी २०२० मध्ये निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत मागील निवडणुकीच्या काळात आयोगाने घेतलेल्या अनेक निर्णयांवर नाराजी व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT