prashant kishor narendra modi 
देश

अनाथ मुलांसाठी 'पीएम केअर्स'; प्रशांत किशोर यांची मोदींवर टीका

कार्तिक पुजारी

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर ( Election strategist prashant kishor) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयाने लहान मुलांसाठी जाहीर केलेल्या तरतुदीवर टीका केली आहे.

नवी दिल्ली- निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर ( Election strategist prashant kishor) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयाने लहान मुलांसाठी जाहीर केलेल्या तरतुदीवर टीका केली आहे. कोरोनामुळे आपल्या आई-वडिलांना गमावलेल्या मुलांना पीएम केअर्स (PM CARES) फंडमधून मदतीची घोषणा करण्यात आली आहे. यावर बोलताना प्रशांत किशोर यांनी बोचरी टीका केली. मोदी सरकारकडून आणखी एक मास्टरस्ट्रोक, चुकीच्या कोरोना हाताळणीमुळे उद्धवस्त झालेल्या लहान मुलांना सहानुभूतीचा प्रयत्न, असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. (Election strategist prashant kishor criticize narendra modi PM CARES for Children corona)

लहान मुलांना तत्काळ मदतीची आवश्यकता आहे, पण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या सवलतीबाबत त्यांना पॉझिटिव्ह राहण्यास सांगण्यात येत आहे. मोफत शिक्षण देण्याच्या आश्वासनासाठी पीएम केअर्सचे आभार माना, जो संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार आहे. आयुष्यमान भारतमध्ये समावेश करण्याच्या आश्वासनासाठी पंतप्रधानांना धन्यवाद द्या, जो 50 कोटी भारतीयांच्या आरोग्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ओळखला जातो. पण, गरज पडल्यास साधं बेड किंवा ऑक्सिजनही पुरवू शकत नाही.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी जी मुले कोरोनाकाळात अनाथ झाली आहेत त्यांच्यासाठी 'PM-CARES for Children’ ही योजना आणली आहे. याद्वारे अनाथ मुलांसाठी तरतूद केली जाणार आहे. या मुलांना 18 वर्ष झाल्यानंतर मासिक ठराविक रक्कम मिळणार आहे. तर वयाच्या 23 वर्षाच्या नंतर 10 लाखांची मदत या फंडातून मिळणार आहे. तसेच या अनाथ मुलांचा आयुष्यमान भारत ( Ayushman Bharat) अंतर्गत आरोग्य विमाही काढला जाणार आहे. ज्याचे हप्ते PM CARES मधून दिले जाणार असल्याचेही पंतप्रधान कार्यालयातून (Prime Minister's Office) सांगण्यात आले आहे. याअंतर्गत मुलाचे वय 18 वर्ष होईपर्यंत 5 लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा मिळणार आहे आणि याचा प्रीमियम पीएम केअर्समधून दिला जाईल.

पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, कोरोनामुळे अनेक मुलांनी आपल्या आई-वडिलांना गमावलं. सरकार अशा मुलांची काळजी घेईल, त्यांच्यासाठी सन्मानजनक जीवन आणि संधीची सुनिश्चिती करेल. लहान मुलांसाठी पीए-केअर्सच्या माध्यमातून शिक्षण आणि अन्य मदत दिली जाईल. मोदींनी ट्विटमध्ये पीआयबीची लिंक शेअर केली होती, त्यात मुलांच्या मदतीसंबंधी सर्व माहिती देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PPF vs ELSS vs NPS: 5,000 रुपयांची दरमहा गुंतवल्यास कुठे मिळेल जास्त परतावा? 15 वर्षांत किती तयार होईल फंड

Ankshastra : 'या' 3 मुलांकाचे लोक असतात प्रचंड कृतघ्न; चांगुलपणाची कधीच करत नाहीत परतफेड, मित्र म्हणून मदत करण्यापूर्वी नक्की करा विचार

Latest Marathi News Live Update : हे बिल दलित आणि मागासवर्गीय लोकांच्या हिताचे नाही - राहुल गांधी

Indian Railways Free journey : 'या' लोकांना रेल्वेने मोफत प्रवास करता येणार, वाचणार हजारो रुपये; काय आहे MST योजना?

MPSC Success Story: ऊसतोड मजुराच्या मुलाची जिद्दीची कमाल; तांड्यावरून न्यायालयापर्यंतचा प्रवास, ज्ञानेश्वर चव्हाण झाले न्यायाधीश!

SCROLL FOR NEXT