Prashant Kishor- Rahul Gandhi esakal
देश

ट्विट, कँडल मार्चनं भाजपचा पराभव करणं कठीण : प्रशांत किशोर

सकाळ डिजिटल टीम

'मोदी सर्वांचं ऐकतात. हीच त्यांची ताकद आहे. लोकांना काय हवंय, हे त्यांना चांगलं माहीत आहे.'

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी पुन्हा काँग्रेस पक्षावर (Congress Party) निशाणा साधलाय, त्यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) जोरदार टीका केलीय. भारतात काँग्रेसशिवायही विरोध शक्य आहे. पक्षाला वाचवायचं असेल तर लोकशाही पद्धतीनं गांधी घराण्याबाहेरच्या नेत्याची अध्यक्षपदी निवड करावी, असा सल्ला पीके यांनी काँग्रेसला दिलाय. तसेच ट्विट आणि कँडल मार्चच्या माध्यमातून तुम्ही भाजपला (BJP) कधीच हरवू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला सामोरे जाण्यासाठी विरोधकांसाठी त्यांची 'ब्लू प्रिंट' देखील सादर केलीय. काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले, देशातील सर्वात जुन्या पक्षाशिवाय भाजपविरोधी आघाडी उभारणं शक्य आहे. 1984 नंतर काँग्रेसनं एकहाती लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जिंकली आहे. गेल्या दहा वर्षांत काँग्रेसचा 90 टक्के निवडणुकीत पराभव झालाय. त्यामुळं काँग्रेस नेतृत्वानं पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मी जवळपास काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, नंतर मी पक्षात जाणं टाळलं, असंही ते म्हणाले.

पीएम मोदींचं (Narendra Modi) कौतुक करताना किशोर पुढे म्हणाले, मोदी सर्वांचं ऐकतात. हीच त्यांची ताकद आहे. लोकांना काय हवंय, हे त्यांना चांगलं माहीत आहे. पुढील काही दशकं देशाचं राजकारण भाजपभोवती फिरणार असल्याचंही पीके म्हणाले. आजकाल प्रशांत किशोर ममता बॅनर्जींसाठी निवडणुकीची रणनीती बनवत आहेत. याआधी त्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी नितीश कुमार, राहुल गांधी, अखिलेश यादव, एम. के. स्टॅलिन, जगन मोहन रेड्डी, अरविंद केजरीवाल आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासाठीही निवडणूक रणनीती बनवलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT