CM Post Esakal
देश

CM Post: निवडणूक मोदींच्या नावाने लढवली आता मुख्यमंत्री कोण? भाजपने जिंकलेल्या तिन्ही राज्यातील सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात?

चार राज्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता या राज्यांच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

चार राज्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता या राज्यांच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू झाली आहे. मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपली बाजू अधिक भक्कम केली. परंतु भाजपचे नेतेमंडळी धक्कातंत्राचा वापर करून शिवराजसिंह चौहान यांच्या पर्यायाचा विचार करू शकेल. (Latest Marathi News)

गेल्या १८ वर्षांपासून शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री असून सरकारच्या विरोधात त्यांनी लोकांमध्ये जनमत होऊ दिले नाही. याशिवाय केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. परंतु सातत्याने भाजपला विजयी करणारे व ओबीसीमधून आलेल्या शिवराजसिंह चौहान यांना तात्काळ हटविणेही भाजपच्या नेतृत्वाला कठीण जाणार आहे.

राजस्थानमध्ये पेच

भाजपच्या नेत्यांची खरी परीक्षा राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी निवडीच्यावेळी होणार आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या प्रबळ दावेदार असल्यातरी भाजपच्या नेत्यांचे त्यांचे चांगले संबंध नसल्याने त्यांच्या नावावर फुली बसण्याची अधिक शक्यता आहे. याशिवाय यापदासाठी राजस्थानमध्ये सर्वाधिक उत्सुक व्यक्ती म्हणजे खासदार बाबा बालकनाथ आहेत. ते तिजारा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

बाबा बालकनाथ यांना राजस्थानचा योगी म्हटले जाते. याशिवाय खासदार दिया कुमारी यांना राज्याची सूत्रे देण्याची शक्यता नाकारता येत नाही. वसुंधरा राजे यांना पर्याय म्हणून उभे करण्यासाठी त्यांच्याप्रमाणे राजघराण्यातून आलेल्या दियाकुमारी यांना निवडणुकीत उतरविण्यात आले. याशिवाय सी. पी. जोशी व विरोधी पक्षनेते सतीश पुनिया यांच्या नावावरही भाजपला विचार करावा लागणार आहे.(Latest Marathi News)

छत्तीसगडमध्ये कोण

छत्तीसगडमध्ये डॉ. रमणसिंग यांनी सलग १५ वर्षे भाजपची सत्ता राबविली. गेल्या निवडणुकीत भाजप पराभूत झाल्यानंतर त्यांना पक्षाच्या नेतृत्वाने काहीसे बाजूला केले आहे. आता पुन्हा भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांचे नाव समोर आले आहे. परंतु त्यांनी या शर्यतीत आपण नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण साव यांचे सर्वात समोर आहे. याशिवाय माजी सनदी अधिकारी ओ. पी. चौधरी व खासदार सरोज पांडे यांच्याही नावांचा विचार होऊ शकतो. (Marathi Tajya Batmya)

तेलंगणात रेवंथ रेड्डी

तेलंगणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार रेवंथ रेड्डी यांच्या नावाला सध्यातरी दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. गेल्या वर्षांपासून त्यांनी पक्षाच्या प्रचारात गुंतवून ठेवले होते. निवडणुकीपूर्वी बीआरएस व भाजपत गेलेल्या नेत्यांना काँग्रेसमध्ये आणून या दोन्ही पक्षांना मोठे खिंडार पाडले होते. यामुळे त्यांच्याऐवजी दुसऱ्या नेत्याचा नावाचा विचार काँग्रेस नेतृत्वापुढे नसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara: 'क्रिकेटसाठी तू बरीच तडजोड केलीस, आता...' पुजारासाठी पत्नी पूजाची भावनिक पोस्ट

'वडापाव'मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी; ठरणार प्रसाद ओकचा १०० वा चित्रपट

Video: असं कुठं होतं का राव! US Open स्पर्धेत टेनिसपटूचा राडा, फोटोग्राफरचा व्यत्यय अन् भिडला अम्पायरला; प्रेक्षकांनी दिली साथ

Hartalika Vrat 2025 Marathi Wishes: शिव व्हावे प्रसन्न...! हरतालिकेच्या प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा, वाचा हटके संदेश

Nashik Crime : एकतर्फी प्रेमाचा भयानक शेवट; सिडकोतील अल्पवयीन विद्यार्थिनीने संपवलं जीवन, दोघे संशयित अटकेत

SCROLL FOR NEXT