देश

हत्तीच्या मदतीने पाडलं अतिक्रमण, सोशल मीडियावर चर्चा

सकाळ डिजिटल टीम

आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यात अनोखा प्रकार पाहायला मिळाला. जंगलाच्या परिक्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण झालं होतं. स्थानिक नागरिकांनी काही घरं आणि दुकानांचं बांधकाम केलं होतं.

हे नॅशनल पार्क पर्यटक आणि प्राणी प्रेमींचं कायम आकर्षण ठरलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. अशा वेळी जंगलान नव्याने काही हॉटेल सुरू करण्यात आले होते. ही सर्व बांधकामं अनधिकृत होती.

सर्वोच्च न्यायालयात काही वन्यजीव प्रेमींनी याविरोधात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने जारी केलेल्या निर्देशांनुसार हे बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाच्या आजूबाजूच्या कॉरिडॉरमधील ही बांधकामं हटवण्यात आली.

कारण या परिक्षेत्रात प्राण्यांचा वावर होता. या ठिकाणी मानवी वस्ती झाल्याने प्राण्यांच्या मुक्त संचारात अडथळा येत होता. त्यामुळे बांधकामं हटवण्यासाठी जेसीबी मशीन सोबतच हत्तीचाही वापर करण्यात आला. यानंतर सर्व बांधकामं भूईसपाट करण्यात आली. यावरून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

SCROLL FOR NEXT