Elgar Parishd 
देश

एल्गार परिषद: JNU, TISSच्या विद्यार्थ्यांचा हिंसाचारासाठी वापर- NIA

राष्ट्रीय तपास एजन्सीकडून कोर्टात आरोपपत्र सादर

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भीमा कोरेगाव हिंसाचार संबंधीत एल्गार परिषद प्रकरणी राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) सोमवारी कोर्टात आरोपपत्र दाखलं केलं. या आरोपपत्रात NIA नं दावा केला की, "दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU) तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS)सह देशातील विविध विद्यापीठातील विद्यार्थांना दहशतवादी कारवायांसाठी वापर करण्यात आला आहे" २२ आरोपींविरोधात एनआयएनं हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

एनआयएनं म्हटलं की, "आरोपींनी सरकार, नागरी प्राधिकरणाविरोधात किंवा सरकारी अधिकाऱ्याविरोधात कट कारस्थान रचून भारताच्या सार्वभौमत्वाला, एकतेला आणि सुरक्षेला धोका निर्माण केला आहे." या आरोपपत्रात १५ आरोपींविरोधात विविध प्रकारचे १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील आरोपींमध्ये मानवाधिकार आणि नागरी स्वातंत्र्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यामध्ये असंही म्हटलंय की, "कोर्टाच्या परवानगीने त्यांच्यावर बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यान्वये (UAPA) आणि आयपीसी (IPC) अतंर्गत विविध प्रकारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत"

दरम्यान, NIA च्या म्हणण्यानुसार आरोपी हे बंदी असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) अर्थात CPI (Moist) या संघटनेचे अॅक्टिव्ह सदस्य आहेत. ज्यांना या प्रकरणी अटक झालेली आहे त्यामध्ये सुधा भारद्वाज, वर्णन गोन्साल्विस, हॅनी बाबू, आनंद तेलतुंबडे, शोमा सेन, गौतम नवलखा आणि इतरांचा समावेश आहे.

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारविरोधात छेडलं युद्ध

NIAनं आरोपपत्रात असाही दावा केलाय की, "आरोपींना केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारविरोधात युद्ध छेडण्याचा कट रचला होता. त्यासाठी नेपाळ आणि मणिपूर येथून ४,००,००० बंदुकीच्या गोळ्या आणि इतर शस्त्रात्रांसह M4 या शस्त्रासाठी वार्षिक ८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आणि ती जमाही झाली. प्रकरणात आरोप निश्चिती झाल्यानंतरच खटल्याची सुनावणी सुरु होईल.

काय आहे प्रकरण?

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाड्याच्या प्रांगणात एल्गार परिषद संपन्न झाली होती. या परिषदेत कथीत भडकाऊ भाषणं झाली होती. त्यामुळेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे ऐतिहासिक युद्ध स्मारकाजवळ दंगल उसळल्याचं सांगितलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT