mamata banerjee esakal
देश

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, जखमी झाल्याने तातडीने रुग्णालयात हलवलं

संतोष कानडे

Mamata Banerjee News : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे. लँडिंग होत असतांना हेलिकॉप्टरला झटके बसल्याने त्या जखमी झाल्या. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं.

आज मंगळवारी ममता बॅनर्जी ह्या जलपाईगुडी येथून बागडोगरा येथे जात होत्या. मात्र हवामान खराब झाल्याने सालुगाडा येथील आर्मी एअरबेसवर त्यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. लँडिंगनंतर ममता यांना कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे.

हेलिकॉप्टर उतरतांना झटके बसल्याने ममतांच्या पाठीला आणि गुडघ्याला जखम झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. दरम्यान, बंगालमध्ये ८ जुले रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मतदानापूर्वी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान राज्यभरातून हिंसेच्या घटना घडत आहेत. या घटनांमध्ये अनेकांनी जीवदेखील गमावला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, दिनहाटा येथील जरीधल्ला येथे मंगळवारी सकाळी हिंसा भडकली. दोन गट एकमेकांना भिडले. त्यानंतर गोळीबाराची घटना घडली. याच घटनेमध्ये ५ जण जखमी झाल्याची माहिती आहे तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

"त्यांची मी नक्कल केली पण त्यांनी..." संध्या यांच्या आठवणीत प्रिया यांची भावूक पोस्ट; "त्यांची पुन्हा भेट..'

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

SCROLL FOR NEXT