Digital-India
Digital-India sakal
देश

‘फाइव्ह-जी’ तंत्रज्ञानाच्या विकासावर भर; ‘यूपीआय’ उपायांचे राष्ट्रपतींकडून कौतुक

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘डिजिटल इंडिया’ (digital india)आणि अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने ‘युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस’च्या (यूपीआय) यशासाठी केंद्र सरकारने (central government)केलेल्या उपाययोजनांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद(president ramnath covind) यांनी आज तोंडभरून कौतुक केले. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेला उद्देशून केलेल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. ते म्हणाले,‘‘ मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ‘यूपीआय’च्या माध्यमातून आठ लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक रकमेचे व्यवहार झाले आहेत. बचत गटांच्या सदस्य असणाऱ्या देशभरातील हजारो महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना ‘बॅंकिंग सखी’ म्हणून यात सामावून घेण्यात आले आहे, याच महिला ग्रामीण भागामध्ये बॅंकिंग सेवा पोचविण्याचे काम करत आहेत. देशातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी सरकार फाइव्ह-जी वायरलेस तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देत आहे.

‘सेमी कंडक्टर’संदर्भातील ‘पीएलआय स्कीम’च्या माध्यमातून आमच्या स्टार्टअपसाठीची इकोसिस्टिमला बूस्टर मिळेल.’’ पेटंट आणि ट्रेडमार्क सेक्टरसाठी केंद्र सरकारने विविध नियम शिथिल केले असून त्यामुळे पेटंटसाठी सहा हजार अर्ज आले असून ट्रेडमार्कसाठी २० हजार अर्ज (२०२१-२२) आले आहेत, असेही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.

राष्ट्रपती म्हणाले (president of india)

  1. देशभरातील ७० टक्के लोकांचे लसीकरण(vaccination) पूर्ण

  2. सर्वांत मोठ्या अन्नधान्य वितरण कार्यक्रमाची अंमलबजावणी

  3. शेतकरी, कामगारांसाठी नव्या उपाययोजना

  4. महिला सशक्तीकरणासाठी उपाययोजनांची आखणी

  5. टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताची ताकद दिसली

  6. स्टार्टअप, सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी मोठे काम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT