crime esakal
देश

कामावरून काढून टाकायला सांगणाऱ्या मालकाच्या पत्नीचा खून

दिल्लीच्या बुरारी परीसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

सुधीर काकडे

नवी दिल्लीमधून सध्या एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका कर्मचाऱ्याने आपल्या मालकाच्या पत्नीचा खून केल्याचं समोर आलं आहे. दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ३१ वर्षीय व्यक्तीने स्वत: या गुन्ह्याची कबूली दिली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी राकेश हा दिल्ली विद्यापीठात सहाय्यक प्राध्याकाच्या वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्यावेळी मालकाच्या पत्नीने राकेशला कामावरून काढून टाकण्यास सांगितले होते. या गोष्टीचा राग मनात धरून राकेशने हा गुन्हा केल्याचं समजतं आहे.

सोमवारी सायंकाळी दिल्लीतील बुरारी परिसरात पोलीस गस्त घालत असताना ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून आरोपीविरूद्ध बुरारी पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घरातून पिंकीचा मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर सिंग कलसी यांनी दिली आहे.

चौकशीदरम्यान राकेशने पोलिसांना सांगितले की, दिल्ली विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या वीरेंद्र कुमार याच्याशी तो तीन वर्षांपासून तो संपर्कात होता. कुमारने आपली टॅक्सी राकेशला दिली आणि घराच्या वरच्या मजल्यावर त्याच्या कुटुंबाला राहण्यासाठी एक खोली दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT