train accident chennai esakal
देश

Train Accident: चेन्नईत रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरले, कोणतीही हानी नाही...मोठी दुर्घटना टळली!

CD

चेन्नई, ता. २४ (पीटीआय) ः आवाडी येथे मंगळवारी पहाटे उपनगरीय रेल्वेचे तीन रिकामे डबे रुळावरून घसरले. परिणामी या व्यग्र मार्गावरील गाड्या आज उशिराने धावत होत्या. पहाटे ५.४० च्या सुमारास हा अपघात घडला. डबे रिकामे असल्याने त्यात प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

चार डबे रुळावरून घसरल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते; परंतु दक्षिण रेल्वेने नंतर तीन डबे घसरल्याचे स्पष्ट केले. उपनगरीय ट्रेनचे शेवटचे तीन डबे ०५:४० वाजता आवडी ईएमयू कारशेडमधून मुख्य मार्गावर जात असताना आवाडी रेल्वे स्थानकावर रुळावरून घसरले, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. अपघातामुळे झालेल्या ओव्हरहेड वायरमधील बिघडामुळे मुख्य मार्गावर वाहतुकीस व्यत्यय येऊन चेन्नई सेंट्रलकडे जाणारी उपनगरीय सेवा प्रभावित झाली.

चेन्नई सेंट्रलकडे जाणाऱ्‍या पाच अएमयू गाड्या उशिराने धावल्या. येथून तीन एक्स्प्रेस गाड्या-वंदे भारत आणि शताब्दी सेवा म्हैसूरपर्यंत आणि चेन्नई-कोइम्बतूर कोवई एक्स्प्रेस अंबत्तूर रेल्वे स्थानकाजवळ नियमित करण्यात आल्या. चेन्नई सेंट्रलवरून निघणाऱ्या सप्तगिरी एक्स्प्रेस (चेन्नई-तिरुपती) आणि बेंगळूरकडे जाणारी वृंदावन एक्स्प्रेस आणि डबल डेकर एक्स्प्रेसचे वेळापत्रक बदलण्यात आले. दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असल्याचे रेल्वेने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT