terrorist  Sakal
देश

Anantnag Encounter : भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

सकाळ डिजिटल टीम

Jammu Kashmir Anantnag Encounter : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, या कारवाईमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पोशक्री भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर घेराबंदी करून दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी दहशवाद्यांनी गोळीबार केला. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.

दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित

दरम्यान, कारवाईत मारले गेलेले दहशतवाद्यांची ओळख दानिश भट उर्फ ​​कोकाब दुरी आणि बशारत नबी अशी करण्यात आली असून, हे दोघेही प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित होते. हे दोघेही 9 एप्रिल 2021 रोजी सलीम या टीए कर्मचारी आणि 29 मे 2021 रोजी दोन नागरिकांच्या हत्येमध्ये सामील होते. याआधी सोमवारी दहशतवाद्यांनी अनंतनागच्या इमामसाहेब भागात एसओजी कॅम्पवर हल्ला केला होता. रात्री उशिरा दहशतवाद्यांनी एसओजी कॅम्पला लक्ष्य करत गोळीबार केला. जवानांच्या प्रत्युत्तरानंतर दहशतवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर लगेचच संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू करण्यात आली. या हल्ल्यात कोणालाही इजा झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT