मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर Sakal
देश

'काश्मीर फाईल्स पेक्षा मोठमोठ्या फाईल्स इथल्या गल्लीबोळात घडतात'

काश्मीर फाईल्स सारखे चित्रपट पाहून आपल्या डोळ्यात अश्रू येतात पण त्यापेक्षा मोठ्या फाईल्स इथल्या गल्ल्यांमध्ये घडत आहेत.

दत्ता लवांडे

इंदौर : इंदौरमधील सानवर रोडवर काही विशिष्ट वर्गाच्या लोकांनी जमिनीवर अतिक्रमण केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी हे अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

"आपण तळागाळातल्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे. काश्मीर फाईल्स सारखे चित्रपट पाहून आपल्या डोळ्यात अश्रू येतात पण त्यापेक्षा मोठ्या फाईल्स इथल्या गल्ल्यांमध्ये घडत आहेत. आपल्याला या तळागाळातल्या वेगवेगळ्या कटांना उखडून काढायचे आहे. ही माझी नम्रपणे विनंती आहे." असं उषा ठाकूर लघु उद्योग भारतीच्या २९ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने बोलताना म्हणाल्या. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानु प्रताप सिंग वर्मा आणि खासदार सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री ओमप्रकाश सकलेचा यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

या कार्यक्रमादरम्यान उषा ठाकूर यांनी मंत्र्यांच्या आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रश्नावर बोट ठेवले. त्या बोलताना म्हणाल्या की, सानवर रोडवर काही विशिष्ट वर्गाच्या लाकांनी अतिक्रमण केले असून भविष्यात अशी प्रकरणे शोकाचे कारण बनतील. यावर तुम्ही केलेल्या कारवाईचा तपशील द्या,आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हा परिसर अतिक्रमणमुक्त झाला पाहिजे आणि वातावरण स्वच्छ व मोकळे असावे." असा आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.

दरम्यान लाऊडस्पीकरच्या वादावर त्यांचे मत विचारले असता त्या म्हणाल्या की, "लाऊडस्पीकरच्या वापरामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत अनेक याचिका प्राप्त झाल्या असून यावर घटनात्मक चौकटीत राहून काम केले पाहिजे." असं त्या बोलताना म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT