ED 
देश

700 कोटींचे शेअर्स गोठवले,'कार्वी स्टॉक ब्रोकिंग'वर ईडीचा छापा

कार्वी स्टॉक ब्रोकिंग'वर ईडीचा छापा

ओमकार वाबळे

कार्वी स्टॉक ब्रोकिंग आणि सीएमडी पार्थसारथीवर छापे टाकल्यानंतर सक्तवसुली संचलनालयाने 700 कोटी रुपयांचे शेअर्स गोठवले आहेत. आज 25 सप्टेंबरला ईडीने यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे.

कार्वी स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड (केएसबीएल) चे सीएमडी सी पार्थसारथी आणि अन्य काही जणांच्या विरोधात मनी लाँडरिंगच्या तपासाचा भाग म्हणून 700 कोटी रुपयांचे शेअर्स गोठवले आहेत. मागील महिन्यात तेलंगणा पोलिसांनी अटक केल्यानंतर पार्थसारथी सध्या हैदराबादच्या चंचलगुडा कारागृहात आहे.

ईडीने 22 सप्टेंबर रोजी हैदराबादमधील सहा ठिकाणी आणि कार्वी ग्रुप ऑफ कंपनी तसेच जोडलेल्या संस्था आणि सी पार्थसारथी यांचे कार्यालय आणि निवासस्थानी शोधमोहिम राबवली. मालमत्तेची कागदपत्रे, वैयक्तिक डायरी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, ईमेल डंप यासह काही धक्कादायक पुरावे जप्त करण्यात आले असून त्याची छाननी सुरू असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पार्थसारथी हे वविध कंपन्यांमध्ये काही डिल्समार्फत पैसे गुंतवत आहेत. तसेच शेअर्स ऑफलोड करण्याचा प्रयत्न केल्याचे ईडीने सांगितले. अशा प्रकारे, पुढील तपास सुरू असेपर्यंत ईडीने 24 सप्टेंबर रोजी हे शेअर्स गोठवण्याचा आदेश जारी केला आहे. या शेअर्सचे मूल्य 2019-20 च्या मूल्यांकनानुसार 700 कोटी रुपये झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus: रक्षाबंधनसाठी 'बेस्ट'ची मोठी भेट, १३६ जादा गाड्या चालवण्याचे नियोजन

Sindhudurg Elephant Attack: ओंकार हत्ती आक्रमक पळताना शेतकरी जखमी, फोंडयेत मोटारीची नासधूस

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

Gadchiroli News: विमानतळ आणि MIDC साठी जमीन संपादनाला विरोध; गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी मनसेकडे मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT