Enforcement Directorate seals the National Herald office in money laundering case  
देश

EDकडून 'यंग इंडियन लिमिटेड'चे कार्यालय सील; मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय(ED)ने यंग इंडियन लिमिटेड (Young Indian Ltd Office) चे ​​कार्यालय सील केले आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास यंत्रणेने ही कारवाई केली आहे. दरम्यान यादरम्यान काँग्रेस मुख्यालयाबाहेरील रस्त्यावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थान 10 जनपथच्या बाहेरही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यंग इंडिया लिमिटेडने नॅशनल हेराल्ड चालवणाऱ्या असोसिएट जर्नल्स लिमिटेडचे ​​अधिग्रहण केले आहे.

विशेष म्हणजे काल ईडीने नॅशनल हेराल्ड कार्यालयासह 12 ठिकाणी छापे टाकले होते. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात केंद्रीय तपास संस्थेने काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर काही दिवसांनी ही कारवाई करण्यात आली आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र चालवणारी कंपनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) च्या यंग इंडियनच्या अधिग्रहणाशी संबंधित नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाची ईडीने चौकशी केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाचे म्हणणे आहे की, यंग इंडियनने एजेएलची 800 कोटींहून अधिक संपत्तीमध्ये फेरफार केला आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, ती सोनिया गांधी आणि राहुल गांधी, यंग इंडियनचे भागधारक यांची मालमत्ता मानली जावी, ज्यासाठी त्यांनी कर भरावा. सोनिया आणि राहुल गांधी यंग इंडियनचे प्रवर्तक आणि बहुसंख्य भागधारकांपैकी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramraje Naik-Nimbalkar: आता लढायचं, पक्ष कुठला ते नंतर बघू: रामराजे नाईक-निंबाळकर; कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News : महाराष्ट्राला केंद्राकडून १५६६ कोटींची मदत; पूरग्रस्तांसाठी दिलासा

Satara Maratha Community: 'सातारा गॅझेटियर तत्काळ लागू करा'; मराठा समाज बांधव आक्रमक, अन्यथा उपोषण सुरू करण्याचा इशारा

Morning Breakfast Recipe: जर घरातील लोकांना एकाच प्रकारच्या नाश्त्याचा कंटाळा आला असेल तर ट्राय करा ओट्स ढोकळा अन् पराठा, सोपी आहे रेसिपी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT