pm modi get covid 19 vaccine dose 
देश

लसीकरणात धर्मगुरुंना सहभागी करुन घ्या, असं मोदी का म्हणाले?

'आपण लसीचे १ अब्ज डोस झाल्यानंतर शिथिल झालो, तर...'

दीनानाथ परब

नवी दिल्ली: कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल (Vaccination) पसरवल्या जाणाऱ्या अफवा (Rumours) दूर करण्यासाठी स्थानिक पातळीवर धर्मगुरुंना (Religious leaders) सहभागी करुन घ्या, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी आज जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दिले. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांच्या दंडाधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आढावा बैठक घेतली. ४० पेक्षा जास्त जिल्ह्यांचे दंडाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

लसीच्या पहिल्या डोसप्रमाणे दुसऱ्या डोसलाही तितकचं गांभीर्याने घेण्याची विनंती मोदींनी देशातील जनतेला केली. लसीचे १ अब्ज डोस झाल्यानंतर देशात शिथिलता आली, तर दुसरं संकट निर्माण होऊ शकतात, असं मोदी म्हणाले.

"आजार आणि शत्रूला कधीही कमी लेखू नका. त्यांच्याशी शेवटपर्यंत लढावं लागतं. म्हणून, माझी इच्छा आहे की आपण थोडासाही हलगर्जीपणा करू नये" असे ते म्हणाले. "तुमच्या मेहनतीमुळे आजपर्यंत इथवर प्रगती करणं शक्य झालं आहे. आशा कर्मचाऱ्यांनी भरपूर काम केलं आहे. अनेक मैल अंतर चालून, दुर्गम भागापर्यंत लसीकरण पोहोचवलं. आपण लसीचे १ अब्ज डोस झाल्यानंतर शिथिल झालो, तर नवीन समस्या निर्माण होऊ शकतात" असे मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT