Fire Accident News esakal
देश

Fire Accident News: झोपेत असताना घर पेटलं अन्...; संपुर्ण कुटुंबाचा होरपळून मृत्यू, गर्भवती महिलेसह २ लहान मुलांचा समावेश

Fire Accident News: बेगुसराय येथे झोपेत असताना घराला लागलेल्या आगीत एक संपूर्ण कुटुंब जिवंत जळून खाक झालं आहे. पती, पत्नी आणि दोन मुलांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

बेगुसरायमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा घराला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. घराला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण कुटुंब जिवंत जळून खाक झाल्याची माहिती आहे. ही घटना बछवारा पोलिस स्टेशन हद्दीतील अरवा पंचायतीच्या नवतोलिया गावात घडली आहे. घटनेच्या वेळी संपूर्ण कुटुंब झोपेत होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. पुढील कार्यवाही सुरू केली आहे.(Entire family burnt alive in bihar husband wife and two children died fire broke out while they were sleeping)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका गर्भवती महिलेसह एकाच कुटुंबातील एकूण चार जण जिवंत जळून खाक झाले. मृतांमध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. सर्वजण घरात एकत्र झोपले होते. मृतांमध्ये अरवा नया टोल वॉर्ड क्रमांक 9 येथील रहिवासी नीरज पासवान, त्यांची वर्षीय पत्नी कविता देवी आणि 5 वर्षांचा मुलगा लव आणि 3 वर्षांचा मुलगा कुश यांचा समावेश आहे. सोमवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास जेवण करून सर्वजण एकाच घरात झोपल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

रात्री ९.४५ च्या सुमारास त्यांच्या घराला अचानक विद्युत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. काही वेळातच संपूर्ण घराला आग लागली आणि सर्व सदस्य जिवंत जळाले. मृत कविता देवी 8 महिन्यांची गरोदर असल्याचं सांगण्यात येत आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, मृत नीरज पासवान हा मोलमजुरी करत होता.

या घटनेनंतर मंगळवारी सकाळी सर्व मृतांचे मृतदेह राखेच्या ढिगाऱ्यातून पोलिस प्रशासनाने बाहेर काढले. घटनास्थळी, एसडीएम राकेश कुमार, तेघरा डीएसपी डॉ रवींद्र मोहन प्रसाद, पोलिस स्टेशनचे प्रमुख अजित कुमार, बीडीओ अभिषेक राज, सीओ दीपक कुमार या अधिकाऱ्यांचे पथक घटनेचा तपास करत होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Mumbai Local Megablock: रविवारी रेल्वे प्रवाशांना फटका बसणार, मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक; वेळापत्रकात बदल

Beed Lawyer News: सरकारी वकिलाने जीव दिल्याच्या प्रकरणात न्यायाधीशावर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

'वीण दोघांतली...'साठी विचारणा झाल्यावर तेजश्रीने २४ तास काहीच उत्तर दिलं नाही; कारण सांगत म्हणाली- त्या एका दिवसात...

Karad News : पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातील मतांची एकदा नव्हे, दोनदा नव्हेत तर तीन वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी; भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आरोप

SCROLL FOR NEXT