Esther Hnamte video viral
Esther Hnamte video viral 
देश

चार वर्षीय एस्तेरचं 'वंदे मातरम्' मोदींना भावलं; व्हिडिओ केला शेअर

सकाळ ऑनलाईन टीम, सकाळन्यूजनेटवर्क

एझॉल: सोशल मीडियावर सातत्याने व्हिडीओ, फोटो आणि मिम्स कोणत्यातरी गोष्टीमुळे चर्चेत येतात आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. काही लोक सोशल मीडियामुळे रातोरात स्टार किंवा सेलिब्रिटी होऊन जातात. पण सध्या सोशल मीडियावर एका चार वर्षाच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत असून तिचं कौतूकही केलं जात आहे. हा व्हिडिओ इतका सुंदर आहे की यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही या मुलीचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. 

ईशान्य भारतातील मिझोरम या राज्यातील एस्तेर हंमटे (Esther Hnamte) या चार वर्षाच्या मुलीने 'वंदे मातरम' हे गीत गायलं आहे. या गीताचा व्हिडिओ यूट्यूबवर टाकला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एस्तेराच्या मधूर आवाजात गायलेल्या गाण्याचा व्हिडिओचं सोशल मिडियावर मोठं कौतुक होत आहे. 

ज्यावेळेस हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला तसा तो सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होण्यास सुरु झाला. पंतप्रधान मोदींनीही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यावर ट्विट करून लिहलं आहे की, 'प्रेमळ आणि कौतुकास्पद! हे ऐकून एस्तेर हंमटेचा अभिमान वाटतोय.'

एस्तेरचा या व्हिडिओने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. त्याचा प्रत्यय सोशल मीडियावर लाइक्स आणि कमेंट्समधून दिसत आहे. जोरमथांगा ने ट्विटरवर एस्तेर हंमटेचा हा व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये त्यांच्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओची लिंकही पोस्ट केली आहे.  

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT