देश

'भाजपमध्ये येणाऱ्या परपक्षीय नेत्यांचे मूल्यांकन करा'

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : निवडणुकीच्या हंगामात केंद्रातील सत्ता असलेल्या भाजपकडे इतर पक्षीय नेत्यांचा वाढता कल असला तरी या नेत्यांना पक्षात घेण्यापूर्वी त्यांची पार्श्‍वभूमी तपासून त्यांचे योग्य मूल्यमापन वा मूल्यांकन करा, असे पक्षनेतृत्वाने राज्यांच्या प्रभारींना बजावल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड व दिल्लीच्या निवडणूक प्रभारी नेत्यांची बैठक आज भाजप मुख्यालयात झाली. त्यामध्ये अमित शहा यांनी भाजपमध्ये येणाऱ्यांबाबत वरील सावधानतेचा इशारा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपमधील इन्कमिंग वाढलेले असताना व इतर पक्षांतील नेत्यांना भाजपमध्ये ओढण्याची स्पर्धाच या पक्षाच्या राज्य नेत्यांमध्ये सुरू असताना केंद्रीय नेतृत्वाने दिलेला हा इशारावजा सल्ला लक्षणीय व सूचक मानला जातो.

आजच्या सुमारे दीड तास चाललेल्या बैठकीत राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा व प्रचाराच्या सूत्राचा आढावा घेण्यात आला. "खंबीर नेतृत्व, लांगूलचालनाच्या राजकारणाला तिलांजली व अतिशय दृढ राजकीय इच्छाशक्तीमुळेच काश्‍मीरचे घातक कलम 370 रद्द झाले,' ही भाजपच्या प्रचाराची महत्वाची "थीमलाईन' असणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या 31 ऑगस्टला (शनिवारी) सोलापुरात होणाऱ्या समारोपावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित रहावे, अशी विनंतीही राज्यातर्फे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल रात्रीतून दिल्लीवारी करून शहा यांना हीच आग्रही विनंती केलेली होती. 

फडणवीस, मनोहलाल व रघुवर दास मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार

महाराष्ट्रासह तिन्ही राज्यांत अनुक्रमे फडणवीस, मनोहर लाल व रघुवर दास हेच भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील यावरही केंद्रीय नेतृत्वाने शिक्कामोर्तब केले आहे.

तसेच दिल्लीत पुढील वर्षी निवडणुका होऊ घातल्या असून, येथे मनोज तिवारी-हर्षवर्धन-विजय गोयल आदींच्या महत्वाकांक्षेत पक्षांतर्गत इतकी साठमारी आहे की "निवडणुका भाजपने जिंकल्याच तर मोदी-शहा ठरवतील तोच मुख्यमंत्री होईल,'' अशा सूत्राने पुढे जाण्याचे पक्षाने ठरविल्याचे समजते.

महासचिव अनिल जैन यांनी सांगितले, की या बैठकीत निवडणूक होणाऱ्या राज्यांतील प्रचाराची रणनीती ठरविण्यावर बैठकीत चर्चा झाली. आजच्या बैठकीला कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा व संघप्रतीनिधी म्हणजेच संघटनमंत्री बी एल संतोष यांच्यासह महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, प्रभारी सरोज पांडे, हरियाणाचे ओम माथूर, दिल्लीचे प्रकाश जावडेकर , झारखंडचे ओम माथूर, हरियाणाचे अनिल जैन व नरेंद्रसिंह तोमर हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT