Bhupesh Baghel
Bhupesh Baghel esakal
देश

‘एफआयआर’नंतरही बघेल यांची प्रचार मोहीम जोरात

सकाळ वृत्तसेवा

बघेल यांच्या प्रचारामुळे विजय होईल असा विश्वास भाटी यांनी व्यक्त केला.

नोएडा : कोविड नियमांच्या भंगावरून(covid rules) उत्तर प्रदेश पोलिसांनी(up police) प्राथमिक चौकशी अहवाल (FIR) दाखल केला असला तरी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chhattisgarh Chief Minister Bhupesh Baghel)यांनी प्रचार मोहीम सुरु ठेवली आहे. गौतम बुद्ध नगर जवळील दादरी आणि जेवार या भागांत त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला.

जेवारमध्ये मनोज चौधरी, तर दादरी येथे दीपक भाटी काँग्रेसतर्फे रिंगणात आहेत. दोन्ही ठिकाणी विद्यमान आमदार भाजपचे आहेत. चौधरी यांच्यासमोर धीरेंद्र सिंह, तर भाटी यांच्यासमोर तेजपाल नागर यांचे आव्हान आहे. धीरेंद्र यांनी २०१७च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी दोन्ही जागा जिंकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. बघेल यांच्या प्रचारामुळे विजय होईल असा विश्वास भाटी यांनी व्यक्त केला.पक्षासाठी निवडणूक निरीक्षकही असलेल्या बघेल यांनी रविवारी नोएडामध्ये(noida) प्रचार केला होता.

प्रकल्पग्रस्तांशी संवाद

जेवार परिसरात उत्तर प्रदेश सरकार भव्य विमानतळ बांधत आहे. त्यासाठी जमीन संपादन करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा फटका बसलेल्या गावांतील नागरिकांची बघेल यांनी भेट घेतली. मतदारांनी जात आणि धर्माच्या राजकारणाच्या पलिकडे जाऊन काँग्रेसला मत देऊन सत्तेवर आणावे आणि उत्तर प्रदेशचा विकास साध्य करावा, असे आवाहन बघेल यांनी केले.

भाजप उमेदवाराविरुद्ध तक्रार

मथुरा - भाजपचे उमेदवार(bjp candidate) मेघश्याम सिंहयांच्याविरुद्ध कोविड नियम (covid rules)तसेच १४४ वे कलम भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली.(FIR) त्यांनी दानघाटी मंदिराला भेट दिली. मंदिरापाशी त्यांनी लोकांसमोरभाषण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT