corona vaccination corona vaccination
देश

लस घेऊनही देशात किती जणांना झाला कोरोना? जाणून घ्या

कार्तिक पुजारी

आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, आतापर्यंत देशात 2 लाख 58 हजार 560 लोकांना ब्रेकथ्रू इन्फेक्शन (लस घेतल्यानंतरही संक्रमण ) झाले आहे.

नवी दिल्ली- देशात कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस घेऊनही अडीच लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, आतापर्यंत देशात 2 लाख 58 हजार 560 लोकांना ब्रेकथ्रू इन्फेक्शन (लस घेतल्यानंतरही संक्रमण ) झाले आहे. यातील 1 लाख 71 हजार 511 लोकांना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर आणि 87 हजार 49 लोकांना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर संक्रमण झालं आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (Corona Latest News)

16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. आतापर्यंत 53 कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. देशात सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक लशीचा डोस दिला जात आहे. या तिन्ही लशींचे डोस घेतल्यानंतर लोकांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे दुसरा लशीचा डोस घेतल्यानंतरही विषाणूची लागण झाली आहे. एकूण लसीकरणाच्या 0.048% टक्के लोकांना ब्रेकथ्रू इन्फेक्शन झालं आहे.

कोरोना विरोधातील लढ्यात लसीकरण हेच प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे जगभरातील देशांनी लसीकरणावर भर दिला आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यास हर्ड इम्युनिटी निर्माण होईल. त्यामुळे संक्रमण रोखता येईल. पण, कोरोना लशीचा डोस घेऊनही संक्रमण होत असल्याचं समोर येत आहेत. त्यामुळे लस कितपत प्रभावी आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

तज्त्रांच्या मतानुसार, कोरोना प्रतिबंधक लस घेऊनही विषाणूची बाधा होण्यात नवल काही नाही. काही लोकांची इम्युनिटी कमजोर असते त्यामुळे अशा लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते. असे असले तरी लस घेतलेल्यांमध्ये आजाराची तीव्रता सौम्य असते. शक्यतो अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येत नाही. खूप कमी प्रकरणात त्यांना ऑक्सिजनवर ठेवावं लागतं. दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत 40,120 रुग्णांची नोंद झालीये. देशात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात डेल्टा प्लसमुळे रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT