Delhi Crime 
देश

Delhi Crime : 'दिल्लीत मुलंही असुरक्षित; १२ वर्षांच्या चिमुरड्यावर सामूहिक अत्याचार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - दिल्ली देशाची राजधानी असली तरी गुन्हेगारीमध्ये देखील देशात सर्वात पुढे आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणाने देश ढवळून निघाला होता. दिल्लीत महिला सुरक्षित नसल्याचे आरोप नेहमीच करण्यात येते. त्यातच आता लहान मुलंही दिल्लीत सुरक्षित नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

दिल्लीत एका १२ वर्षाच्या चिमुरड्यावर ४ जणांनी लैंगिक अत्याचार करून बेदम मारहाण केल्याचं समोर आलं आहे. चिमुरडा सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. या मुलावर चार जणांनी अत्याचार करून त्याला रस्त्याच्या कडेला अर्धमेल्या अवस्थेत सोडून पळ काढला.

दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी या घटनेबद्दल ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, दिल्लीमध्ये मुलेही सुरक्षित नाहीत. महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली असून दिल्ली पोलिसांकडे एफआयआर दाखल केल्याचे स्वाती मालीवाल यांनी सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकाला अटक केली आहे, तर अन्य तीन जण अद्याप फरार आहेत. याप्रकरणी महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT