soumya swaminathan 
देश

जरी ओमिक्रॉनच्या धोक्याची तीव्रता कमी वाटत असली तरी...; WHOचा गंभीर इशारा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन (Dr Soumya Swaminathan) यांनी शुक्रवारी म्हटलंय की, ओमिक्रॉनमुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण जगभरात वाढत आहे. लसीकरण न झालेल्या बहुतांश लोकांमध्येच हे प्रमाण आहे.

ज्या देशांना ओमिक्रॉनची तीव्रता जाणवू लागली आहे अशा देशांसाठी त्यांनी इशारा देत सजग केलं आहे. डॉ. स्वामीनाथन यांनी म्हटलंय की, "ओमिक्रॉनमुळे कमी गंभीर असलेले आजार होऊ शकतात, तरीही मोठ्या संख्येपैकी एक छोटा टक्का अजूनही खूप मोठा आहे आणि तो संपूर्ण आरोग्य यंत्रणेला वेठीस धरू शकतो. पुढे त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, "लसीकरणाने हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूपासून संरक्षण मिळतं. मग हे संक्रमण ओमिक्रॉनपासून असो वा डेल्टा किंवा कोविडच्या इतर कोणत्याही प्रकारामुळे झालेले असो.

भारतामध्ये दैनंदिन कोविड रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होत असल्याने त्यांनी हा इशारा देण्यात आला आहे. ही रुग्णवाढ ओमिक्रॉनमुळे होत आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत भारतातील Omicron ची संख्या 1,270 वर आहे आणि तज्ञांना असं वाटतं की, Omicron ने देशात आधीच डेल्टाची जागा घेतली आहे. अहवालात पुढे असं म्हटलंय की, भारतातील जवळपास 80 टक्के प्रकरणे आता Omicron ची आहेत.

लसींच्या परिणामकारकतेबद्दल बोलताना, डॉ स्वामीनाथन (Dr Swaminathan) यांनी याआधी एक ट्विट केलं होतं. त्यांनी म्हटलंय की, "अपेक्षेप्रमाणे, टी सेल रोगप्रतिकार शक्ती ओमिक्रॉन विरुद्ध चांगली ठेवते. यामुळे गंभीर आजारांपासून आपलं संरक्षण होऊ शकतं. जर केलं नसेल तर कृपया तुम्ही लसीकरण करुन घ्या". नुकतीच ताजी माहिती देताना जागतिक आरोग्य संस्थेनं म्हटलंय की, Omicron चा धोका अधिक असून या व्हेरिएंटने यूएस आणि यूकेमधील डेल्टाला मागे टाकलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT