Arvind Kejriwal Esakal
देश

Arvind Kejriwal: केजरीवाल अन् दारु घोटाळ्यातील आरोपींमध्ये थेट मेसेजद्वारे संवाद; ईडीचा कोर्टात मोठा दावा

Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दारू घोटाळ्यातील आरोपी विनोद चौहानशी संबंध असल्याचा दावा ईडीने केला आहे. दोघे डायरेक्ट मेसेजच्या माध्यमातून बोलायचे असेही सांगण्यात आले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दारू धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी वकील विनोद चौहान यांच्यातील संबंधांबाबत ईडीने अनेक दावे केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने आप आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रावर सुनावणी सुरू केली आहे. सुनावणीदरम्यान मुख्यमंत्र्यांचे आरोपी विनोद चौहानसोबत संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. डायरेक्ट मेसेजवर चर्चेचाही उल्लेख करण्यात आला आहे. विनोद चौहान यांनी न्यायाधीशांशी बोलण्याबाबत सीएम केजरीवाल यांच्याशीही चर्चा केल्याचा दावा करण्यात आला आहे.

2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी दक्षिण गटाकडून रोख लाच हस्तांतरित केल्याच्या आरोपावरून विनोद चौहान यांना ईडीने अटक केली होती. विनोद चौहानकडून १.०६ कोटी रुपये जप्त केल्याचा आरोप ईडीने न्यायालयासमोर केला.

ईडीने न्यायालयात काय केला दावा?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या खटल्यातील आरोपी विनोद चौहान यांच्यातील संबंध असल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ईडीने दावा केला आहे की, अरविंद केजरीवाल हे गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते ज्याचा खर्च अन्य आरोपींनी केला होता. विनोद चौहान यांच्याशी डायरेक्ट मेसेज संभाषणाचा पुरावा असल्याचा दावाही ईडीने केला आहे.

मात्र, या संभाषणावरून ते विनोद चौहान यांच्या पोस्टिंगबाबत न्यायाधीशांशी भेटीबाबत बोलत असल्याचे दिसून येते, त्यामुळे त्यांचे आरोपींशी कोणते संबंध आहेत, असे ईडीने म्हटले आहे.

विनोद चौहान यांनी गोवा निवडणुकीसाठी हवालाद्वारे १.०६ कोटी रुपये हस्तांतरित केल्याचा युक्तिवाद ईडीने केला होता. ईडीच्या वकिलांनी सांगितले की, विनोद चौहान या पैशाचा स्रोत सांगू शकत नाही. सध्या ते तुरुंगात आहेत. याप्रकरणी 21 मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ते सध्या अंतरिम जामिनावर बाहेर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT