Lok Sabha Election  esakal
देश

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी केंद्रीय मंत्र्यांचा भाजपला रामराम! काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

वीरेंद्र सिंह यांच्या पत्नी आणि माजी आमदार प्रेमलता यांनीही काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे

रोहित कणसे

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री वीरेंद्र सिंह यांनी भाजपला रामराम केला असून ते मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. वीरेंद्र सिंह यांचे पुत्र बृजेंद्र यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बृजेंद्र हे हरियाणामधील हिस्सार मतदारसंघाचे खासदार आहेत.

वीरेंद्र सिंह यांच्या पत्नी आणि माजी आमदार प्रेमलता यांनीही काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये येण्याआधी वीरेंद्र सिंह हे काँग्रेसमध्ये होते. दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये ते भाजपमध्ये आले होते. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवत पोलाद मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. भाजप आणि जननायक जनता पक्ष यांच्या युतीला वीरेंद्र सिंह यांनी विरोध केला होता. युतीची शक्यता लक्षात घेऊन बृजेंद्र यांनी भाजपला रामराम केला होता. मात्र भाजप आणि जननायक जनता पक्ष यांनी वेगवेगळ्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. भाजप आणि जननायक जनता पक्ष यांच्याबद्दल युती होणार नसल्याचे स्पष्ट होऊनही वीरेंद्र सिंह यांनी भाजपला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

Pune Crime: पुण्यात कौटुंबिक वादातून गोळीबार; कसबा पेठेत ३० वर्षीय पती जखमी, घटनास्थळी शस्त्र सापडले

Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; खात्यात पोहोचले हजारो कोटी

SCROLL FOR NEXT