Court on NSE Scam Sakal
देश

परीक्षेमध्ये घोटाळा कराल, तर १० कोटींचा दंड अन् १० वर्ष तुरुंगवास

परीक्षेत होणाऱ्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

सुधीर काकडे

जयपूर: देशातील वेगवेगळ्या राज्यांत सध्या पेपरफुटीची अनेक प्रकरणं सुरु आहेत. हजारो जागांसाठी लाखो मुलं आपलं भवितव्य नशिब आजमावत असतात. मात्र त्यामध्ये होणाऱ्या घोटाळ्यामुळे या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येतं. याच पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. जर एखादा परीक्षार्थी किंवा परीक्षक सार्वजनिक परीक्षांमध्ये नियमांचं उल्लंघन करताना आढळला, तर त्याला 10 वर्षांपर्यंत कारावास आणि तब्बल 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येईल. तसंच त्यानंतर त्या विद्यार्थ्याला कोणत्याही सार्वजनिक परीक्षेसाठी बसता येणार नाही.

राजस्थान सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार अशा प्रकरणात सापडलेल्या सर्व मालमत्ता जप्त केल्या जातील. राजस्थान सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक, 2022 मंजूर झाल्यानंतर मंत्र्यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, विधेयकावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षाचे उपनेते राजेंद्र राठोड यांनी ही उत्तर प्रदेश सरकारने मंजूर केलेल्या विधेयकाची कॉपी असल्याचं म्हटलं. "उत्तर प्रदेश सरकारने संमत केलेल्या विधेयकाची कॉपी राजस्थान सरकारने केली आहे. राजस्थान सरकारला काही कॉपीच करायचं असेल तर त्यांनी यूपीकडून राज्यकारभाराचे मार्ग करायला शिकलं पाहिजे असं राठोड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT