PM Narendra Modi Narendra Modi
देश

मोठा निर्णय! विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा वाढणार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदार संघामधील खर्चाची ही मर्यादा वाढवण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये हे बदल महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

निवडणुकीच्या आचारसंहितेनुसार प्रत्येक उमेदवाराला किती खर्च करता येईल, याचं एक विशिष्ट बंधन ठरवून देण्यात आलं आहे. त्यामध्ये बदल करायचा निर्णय आता केंद्र सरकारने घेतला आहे. विधानसभा मतदारसंघात 28 लाख रुपयावरुन 40 लाखापर्यंत उमेदवारास खर्च करता येणार आहे. लोकसभा मतदार संघामध्ये उमेदवाराला 95 लाखांपर्यंत खर्चाची मर्यादा घालण्यात आली आहे. याआधीची मर्यादा 70 लाख रुपये होती. त्यातही महाराष्ट्र, उत्तरप्रदेश सारख्या मोठ्या राज्यांसाठी हा आकडा असणार आहे. तर गोव्यासारख्या लहान राज्यांसाठी लोकसभा मतदारसंघासाठी 75 लाख ही मर्यादा असणार आहे.

याआधी 2014 मध्ये हे नियम बदलण्यात आले होते. त्यावेळी साधारण 10 टक्के वाढ निवडणूक खर्चामध्ये करण्यात आली होती. वाढलेली महागाई आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये वाढलेली लोकसंख्या अशी दोन कारणे देत ही खर्चाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT