देश

चाचण्यांचा कौल काँग्रेसला

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - लोकसभेच्या आगामी निवडणुकीची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला झटका बसण्याचा अंदाज शुक्रवारी मतदानोत्तर चाचण्यांमधून नोंदविण्यात आला आहे. 

हिंदी भाषक पट्ट्यातील मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात भाजपचा पुन्हा सत्तेवर येण्याचा मार्ग खडतर असल्याचे या चाचण्या सांगतात. ईशान्येतील मिझोरामची सत्ता काँग्रेस गमावेल, तर तेलंगणमध्ये सत्तारूढ तेलंगण राष्ट्र समिती पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. आज राजस्थानात ७४, तर तेलंगणमध्ये ६७ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम विधानसभांच्या निवडणुकांसाठी मतदानानंतर झालेल्या चाचणीचे हे निष्कर्ष आहेत.  मध्य प्रदेशात गेली १५ वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपला यंदा काँग्रेसबरोबर काट्याची लढत द्यावी लागेल. एवढेच नव्हे, तर भाजपला येथे बहुमत मिळणार नाही, असा अंदाज आहे. छत्तीसगडमध्येही भाजपला विरोधी काँग्रेसबरोबर झुंजावे लागणार आहे. या राज्यातही भाजपला जागा जास्त मिळतील; पण बहुमतापासून हा पक्ष दूर राहील, असा अंदाज आहे. एकाच पक्षाला दुसऱ्यांदा निवडून न देण्याची परंपरा असलेल्या राजस्थानात यंदाही तसेच चित्र असेल आणि तेथे काँग्रेस सत्तेवर येईल, असे या चाचण्या सांगतात. विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी आठ महिने आधीच सभागृह बरखास्त करून निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या तेलंगणमध्ये मात्र ‘टीआरएस’ पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज आहे. काँग्रेससह अन्य विरोधकांना येथे फार यश मिळणार नाही, असे दिसते. मिझोराममध्ये सत्तारूढ काँग्रेसला सत्ता गमवावी लागण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT